(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्सचे व्हिडिओ शेअर होतात तर कधी अपघातांचे तर कधी प्राण्यांच्या लढतीचे. तुम्ही आजवर माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये झालेली लढत अनेकदा पाहिली असेल मात्र तुम्ही कधी दोन रोबोट्समध्ये झालेलं युद्ध पाहिले आहे का? हे अनोखे दृश्य सध्य्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे, जिथे चीनचे दोन रोबोट्स चक्क एकमेकांविरुद्ध लढताना दिसून येत आहे. हे दृश्य अनोखेच वळण घेते आणि ते पाहणे फारच रोमांचांक ठरते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोबोट कुत्रा आणि ड्रोनमध्ये युद्ध सुरू आहे. ज्याला लोक “भविष्यातील युद्ध” म्हणत आहेत. एक रोबोट कुत्रा आणि ड्रोन एकमेकांवर फटाक्यांनी हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला तर अनेक जण याला मानवतेच्या भवितव्यासाठी धोका असल्याचे सांगत आहेत.
हा व्हिडिओ चीनमधला असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे ड्रोन आणि रोबोट कुत्रा यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मशीनने बनलेले हे सैनिक फटाक्यांचा वापर करून एकमेकांवर धूर सोडत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही घिरट्या घालणारा रोबोट ड्रोन आणि आगीच्या प्रहार करणारा रोबोट डॉग यांना लढताना पाहू शकता. मात्र, हा व्हिडीओ AI जनरेट केलेला आहे की खरा आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही. तसेच या यंत्रांवर कोणाचे नियंत्रण होते की नाही हेही सांगता येत नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या लढाईचे नेमके ठिकाण देखील अज्ञात आहे. मात्र हे दृश्य आता युजर्सचे फार मनोरंजन करत आहेत., लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
Future of war: Chinese robot dog vs. drone. pic.twitter.com/bOFhe1Mh4E
— Clash Report (@clashreport) January 26, 2025
रोबोट्समधील हे युद्धाचे दृश्य @clashreport नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या युद्धावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आधीच 30 वर्षांपूर्वी केले आहे त्याला सायबर युद्ध म्हणतात; हॅलो वर्ल्ड” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काही दशके जाऊ द्या मग आपण सर्व घरात बसून इंटरनेटद्वारे युद्ध लढू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.