(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये नक्कीच तुम्हाला हादरवून सोडतील. हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील असून इथे क्षणार्धात आनंदाचे वातावरण दुःखात बदलल्याचे दिसून आले आहे. लग्नसमारंभ म्हटलं की, आजूबाजूला नाच-गाणे हे असतेच मात्र याचवेळी एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचा थरार नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो आता व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
लग्नसंभारंभ म्हटलं की, अनेक विधी आणि परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक देखील काढली जाते. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मात्र अशाच एका लग्नसमारंभातील हे उत्साहाचे वातावरण क्षणार्धात दुःखात बदलल्याचे दिसून आले आहे. ही घटना कानपूरमधील आहे. हे सर्व दृश्य इतके भयाण आहे की आता अनेकांना हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे. घटनेत नक्की काय घडले ते जाणून घ्या.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सर्वत्र लग्नाच्या मिरवणुकीसाठी जमलेले लोक दिसत आहे. रस्त्यावर एक घोडा आहे जो मिरवणुकीसाठी आणलेल्या बॅंडच्या संगीतावर थिरकत आहे. याच दरम्यान घोडा नाचत असताना त्याच्या पाठीमागे एक चिमुकला चिमुकली येऊन उभा राहतो मात्र यादरम्यान घोडा अचानक नाचता नाचता आपला पाय मागे मारतो, जो त्या चिमुकल्याला लागतो. घोड्याची ही लाथ चिमुकल्याला इतक्या जोरदार बसते की तो समोरील पायरीवर आदळला जातो आणि यात जागीच त्याचा मृत्यू होतो. सर्व धक्कादायक घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
In a tragic incident, a minor child died after being kicked by a horse during wedding celebration in #UttarPradesh‘s #Kanpur.
The shocking incident was caught on camera and the video of the incident is doing rounds on social media. It can be seen in the video that the child who… pic.twitter.com/jL64NNgXkk
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) January 28, 2025
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @HateDetectors नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे दुःखद आहे, कल्पनाही करू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या घोड्यालाही मारले पाहिजे..तरच त्याला कळेल की निष्पाप माणसाला मारणे म्हणजे काय..”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.