
बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, रस्त्यावर दोन बैलांची लढत सुरु असल्याचे दिसते. ते दोघेही रस्त्याच्या किनाऱ्यालगत भांडत असतात ज्यामुळे एक माणूस त्यांना तिकडून हकलवून देतो. यानंतर दोन्ही बैल तिथून धावत सुटतात आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्याासठी पळत सुटतात. आता घडतं असं की, बैल रस्ता ओलांडत असतानाच समोरुन एक महिला दुचाकीवर स्वार होऊन येत असते. यातील एका बैलाची धडक तिच्या बाईकला लागते आणि ती रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळते. ज्या ठिकाणी ती पडते त्या ठिकाणी चारचाकी पार्क केलेली असते ज्यामुळे तिचं डोक चारचाकीला जाऊन धडकतं. हा व्हिडिओ ऋषिकेशच्या वीरभद्र मार्गावरील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये कोणत्याही गंभीर अपघाताची चिन्हे दिसत नाहीत. बैलाने धडक दिल्यानंतर आणि नंतर गाडीने डोक्याला मार लागूनही, ती तरुणी स्वतःच्या पायावर उभी राहू शकली जी खरोखर एक दिलासादायक बाब आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @anshulhindustaanii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या २ लाखाहून अधिकचे लाईक्स मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “सर्वात मोठी गोष्ट आहे की, हा खाली उतरणार कसा?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाचा जुगाड तर काहीतरी आगळाच आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण मला प्रश्न पडतो की, या बाईकचा फायदा काय होणार?”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.