(फोटो सौजन्य: Instagram)
कुटुंबाने समाज आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत कुटुंबाने एक कठीण निर्णय घेतला. घराच्या अंगणात मुलीचा फोटो ठेवून त्यांनी ‘गोरनी’ विधी पार पाडला. यानंतर मुलीच्या फोटोला आग लावण्यात आली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सामान्यतः केले जाणारे सर्व विधी त्यांनी पार पाडले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलीला खूप प्रेम आणि आपुलकीने वाढवले होते, परंतु या कृतीनंतर, ती जिवंत असूनही त्यांच्यासाठी जणू मेलेल्यासारखीच झाली होती.
गोरनी परंपरा काय आहे?
माहितीनुसार, गोरनी काही समाजात पाळली जाणारी एक प्रतीकात्मक आणि सामाजीक परंपरा आहे. या परंपरेनुसार कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या सदस्यांना मृत माणून जिवंतपणीच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातात. तथापि, अशा सामाजिक विधींना कोणताही कायदेशीर किंवा घटनात्मक आधार नसला तरी, या घटनेचा सध्या फार चर्चा होत आहे.
View this post on Instagram
घटना @hindustan नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती दिली असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.एका यूजरने म्हटले की, “त्या कुटुंबाला लाज वाटायला हवी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आणि अशा मागास मानसिकतेसह आपल्याला विकास घडवणार आहोत का?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “या देशात काहीही होणार नाही, आजही इथे इतके अशिक्षित लोक आहेत, हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते”.






