(फोटो सौजन्य: X)
मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की छतावर एक श्वान शांतपणे झोपलेला आहे. रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूला घणघोर अंधार आणि शांतता असते. कुत्र्याला पाहताच बिबट्या त्याच्यावर निशाणा साधतो आणि हळूहळू त्याच्याजवळ जाऊन श्वनावर जीवघेणा हल्ला करतो. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुत्रा जरा घाबरतो पण नंतर बिबट्याला तो चांगलीच अद्दल घडवतो. कुत्रा नंतर जराही घाबरत नाही आणि मोठ्या धाडसाने बिबट्यावर तो प्रतिहल्ला करतो. तो आपल्या पंजांनी त्याच्यावर वार करतो आणि त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. अखेर कुत्र्याची ताकद पाहून बिबट्या घाबरतो आणि गुपचूप तिथून फरार होण्याचा निश्चय करतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बिबट्या छतावरुन फरार होताना दिसून येतो. उत्तराखंडमधील अनेक भागात घनदाट जंगले असल्याने प्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटना इथे नेहमी घडत असतात.
📺WATCH | Dog forces leopard to leave after an attack in Rudraprayag pic.twitter.com/W0Kp21UkBd — The Tatva (@thetatvaindia) September 9, 2026
या घटनेचा व्हिडिओ @thetatvaindia नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘रुद्रप्रयागमध्ये हल्ल्यानंतर कुत्र्याने बिबट्याला निघून जाण्यास भाग पाडले’. व्हिडिओतील घटना सध्या चांगलीच ट्रेंड करत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आज शिकारीच शिकारीच्या तावडीत सापडला!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुत्र्याच्या धाडसाला सलाम”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कुत्र्याने चांगली कामगिरी केली, मला वाटलं त्याची शिकार पक्की आहे पण शेवटी डाव पलटला”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






