शिखर धवनलाही लागलं लड्डू मुत्त्या बाबांच वेड, फिरता पंखा थांबवत दिला आशीर्वाद, हास्यास्पद Video Viral
क्रिकेटपटू शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र तरीही तो सोशल मीडियावर बऱ्याच चर्चेत असतो. त्याच्या मजेदार रिल्स सोशल मीडियावर नेहमीच फार रंगत असतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्याला लड्डू मुत्त्या बाबांच वेड लागल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तो लड्डू मुत्त्या बाबांसारखा फिरता पंखा थाबवून लोकांना आशीर्वाद देताना दिसून येतोय. त्याचा अभिनय पाहून आत अनेकजण व्हिडिओवर फार खुश झाले आहेत आणि व्हिडिओची मजा लुटत आहेत. हा मजेदार व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
गेल्या काही दिवसांत तुम्ही लड्ड मुत्त्या बाबांचे काही व्हायरल व्हिडिओज पाहिले असतील. या व्हिडीओंमध्ये एका व्यक्तीला लोकं खांद्यावर उचलतात आणि मग तो फिरत्या पंख्याची पाती थांबवून लोकांना आशीर्वाद देतो. या बाबांचे भक्तजण म्हणतात, त्यांच्यामध्ये देवाचा अंश आहे, अन् त्यांचा आशीर्वाद घेणाऱ्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात. आता ही गोष्ट किती खरी आणि खोटी याची कोणतीही शाश्वती नाही. आजकाल सोशल मीडियावर अनेक ढोंगी बाबांचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येतात. ज्यात ते मोठमोठे दावे करून लोकांना वेड बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता शिखर धवनने लड्ड मुत्त्या बाबांचा व्हिडिओ बनवत त्यांना चांगलंच रोस्ट केल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – उशीच्या आत लपला होता विषारी साप, उघडून पाहताच फणा काढला बाहेर अन्… थरारक घटनेचा Viral Video
व्हिडिओमध्ये सर्वांनीच कमाल अभिनय केल्याचे दिसून येत आहे. यात शिखर धवन एका खुर्चीवर बसला असून ही खुर्ची तीन लोकांनी पंख्याकडे उचलली असल्याचे दिसते. तसेच दोन व्यक्ती यावेळी डोळे बंद करून आपले डोकं गरागरा फिरवत आहेत. मग शिखर चालू पंख्याला हाथ लावतो आणि डोकं गरागरा हलवत असलेल्या व्यक्तींना आशीर्वाद देतो. यांनतर ते दोन्ही व्यक्ती नॉर्मल होऊन जातात. हा सर्व प्रकार खरं तर, लड्ड मुत्त्या बाबांच्या व्हायरल व्हिडिओत दाखवण्यात आला होता ज्याची मिमिक्री शिखरने केली आहे.’
हेदेखील वाचा – सिंहाच्या कळपाने केली म्हशीची शिकार, दुसरी म्हैस वाचवायला येताच केलं असं काही… चित्तथरारक घटनेचा Video Viral
शिखराचा हा व्हायरल व्हिडिओ @shikhardofficial नावाच्या त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने, ‘फॅनवाल्या बाबांची जय’ असे लिहिले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केलेय आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शिखर दादा, हे काय आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शिखर धवन सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.