Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

Singapore Metro Rules: सिंगापूरमधील MRT मेट्रोच्या कडक नियमांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. anu_amarp या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका मराठी तरुणाने मेट्रोतील नियम दर्शवणारा बोर्ड दाखवला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 12, 2026 | 04:31 PM
Singapore Metro Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Singapore Metro Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सिंगापूर मेट्रोच्या नियमांबाबतचा व्हिडीओ anu_amarp या इंस्टाग्राम अकाउंट
  • मेट्रोमध्ये खाताना किंवा पाणी पिताना आढळल्यास 500 सिंगापूर डॉलरचा दंड
  • 500 सिंगापूर डॉलर म्हणजे जवळपास 37 हजार रुपये
आपण सगळ्यांनी कधी ना कधी मेट्रोने प्रवास केला असेलच. नसेल केला तरी इंस्टावर किंवा सिनेमात मेट्रो बघितली असेल. मेट्रोमध्ये काही नियम असतात हे आपल्याला माहिती आहे. जसे की आधी लोकांना उतरू द्या मग चढा, कचरा करू नका, मोठ्याने बोलू नका. काही संशयास्पद वस्तू दिसली तर हात लावू नका. Singapore Metro Rules:

पण जगात एक अशी पण मेट्रो आहे जिथे तुम्ही साधे पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. जर प्यायला आणि पकडले गेले तर थेट 37 हजार रुपयांचा दंड बसतो. ऐकून विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

हा व्हिडिओ anu_amarp नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आला आहे. सिंगापूरमध्ये राहणारा एक मराठी मुलगा हा व्हिडिओ बनवतो. त्याने सिंगापूर मेट्रोचा एक अजब नियम दाखवला आहे.त्याने व्हिडिओत मेट्रोमध्ये लावलेला एक बोर्ड दाखवला आहे. त्या बोर्डवर लिहिले आहे की मेट्रोमध्ये कोणी खाताना किंवा पाणी पिताना दिसले तर त्याला 500 डॉलरचा दंड लागेल.

Singapore Metro Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

स्वच्छतेबाबत खूपच कडक

500 सिंगापूर डॉलर म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये जवळपास 37 हजार रुपये. फक्त पाणी प्यायल्यामुळे 37 हजार रुपये द्यावे लागतील असा विचार पण आपण करू शकत नाही.सिंगापूरच्या मेट्रोला MRT म्हणतात, म्हणजे मास रॅपिड ट्रान्झिट. तिथे स्वच्छतेबाबत खूपच कडक नियम आहेत. तुम्ही तिथे काही खाऊ शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही, मोठ्याने बोलू शकत नाही, सिगारेट ओढू शकत नाही. साधी पाण्याची बाटली पण उघडायची नाही. जर नियम मोडला तर दंड तर आहेच पण कधी कधी पुढे कायदेशीर कारवाई पण होते.

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

मग तहान लागली तर काय करायचे?

आता प्रश्न असा आहे की पाणी ही तर गरज आहे. समजा प्रवासात अचानक तहान लागली किंवा एखाद्याला चक्कर आली तर काय?याबद्दल लोकांनी खूप प्रश्न विचारले. सिंगापूर मेट्रोच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दल माहिती दिली आहे.

मेट्रोमध्ये कचरा होऊ नये, स्वच्छ राहावी म्हणून हा नियम काढण्यात आला आहे. जर पाणी खाली सांडले तर कोणाचा तरी पाय घसरून अपघात होऊ शकतो. गर्दीच्या वेळी खाणे पिणे हाताळणे पण अवघड होते. सिंगापूरमध्ये मेट्रोची स्टेशन्स अगदी जवळ जवळ आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागत नाही. पुढच्या स्टेशनवर उतरून तुम्ही पाणी पिऊ शकता, असे ते सांगतात. पण तरीही अनेकांना हा नियम थोडा जास्तच कडक वाटतो.आपल्याकडे मुंबई, पुण्याच्या मेट्रोमध्ये असा नियम नाही. तिथे तुम्ही पाणी पिऊ शकता, फक्त कचरा करू नका एवढेच सांगितले जाते.

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’

पण सिंगापूरमध्ये शिस्त आणि स्वच्छता याला सगळ्यात जास्त महत्व दिले जाते, त्यामुळे तिथे असे कडक कायदे आहेत.तुम्हाला काय वाटते, फक्त पाणी प्यायल्यावर 37 हजारांचा दंड लावणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

Web Title: Singapore metro water drinking ban 37000 fine mrt rules rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Metro
  • Singapore
  • viral video

संबंधित बातम्या

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
1

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
2

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
3

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय
4

भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.