सिंह, वाघ आणि बिबट्या हे असे प्राणी आहेत, जे जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये मोडले जातात. कोणतीही शिकार दिसली की ते क्षणार्धात त्यावर हल्ला करून त्याचा खातमा करतात. त्यामुळे प्राणीच काय तर मानवदेखील आशा प्राण्यांच्या वाटेला जायचा प्रयत्न करत नाहीत. त्याच्या सामर्थ्याशी स्पर्धा करणं क्वचितच कोणाला शक्य आहे. यातील बिबट्या हा प्राणी आपल्या वेगवान शिकिरीसाठी ओळखला जातो. बिबट्या मुळातच अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक आहे. त्याच्या हाथी लागलेली गोष्ट त्याच्या तावडीतून सोडवणे इतकी सोपी नाही. तुम्ही सोशल मीडियावर या बिबट्याचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील मात्र असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असावा.
सध्या सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्या बदकाच्या पिल्लाने शक्कल लढवत बिबट्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केल्याचे दिसून येत आहे. इतक्या सामर्थ्यवान प्राण्याच्या तावडीतून सहजासहजी निसटणे सोपे नाही मात्र या पिल्लाने अवलंबलेली शक्कल कौतुकास्पद आहे. याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकजण या पिल्लाच्या हुशारीचे कौतुक करत आहेत.
हेदेखील वाचा – रहस्यमयी जागा! रस्त्यावर चालताना खड्ड्यात पाय गेला अन् दुसऱ्या जगाचा अद्भुत Video Viral
व्हिडिओत नक्की काय झालं याविषयी बोलणे केले तर व्हिडिओमध्ये दिसते की, एक लहान बदक जंगलात जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, बिबट्याची त्याच्यावर नजर पडते आणि बिबट्या झडप घालून बदकाच्या इवल्याशा पिल्लाला पकडते. पण, यात बेडकाचे पिल्लूही हुशार, पळून जाण्याऐवजी बदकाच्या पिल्लाने मरण्याचे नाटक केले. एखादं मृत प्रेत जसं पडून असतं, तसंच हे पिल्लू पडून राहिलं. यात हे लहान बदकाचे पिल्लू मेल्यासारखे दिसते. मात्र, असे असूनही बिबट्या त्याला सोडत नाही, तर दातांमध्ये दाबून मग या बिबट्याने त्या पिल्लाला उचलून दुसरीकडे नेले. तरीही बराच वेळ हा पिल्लू काहीही हालचाल न करता स्तब्ध राहतो. थोड्या वेळात बिबट्याची नजर दुसरीकडे जाताच संधीचं सोनं करत बदकाचं पिल्लू बिबट्याला चकमा देत पळून जातो आणि बिबट्या फक्त त्याच्याकडे बघत राहतो.
Duckling is able to play dead long enough to escape Leopard pic.twitter.com/Iw1VwZ3XAr
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 16, 2024
हा व्हिडिओ आता बराच व्हायरल झाला असून मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणींचे उत्तम उदाहरण ठरत आहे. हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 24 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.