खड्डे हे रस्त्यांचा एक भाग बनले आहेत. भारतात तर अनेक रस्त्यावर फक्त खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. काही जागी तर खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे तेच समजत नाही. ही स्थिती फक्त भारतातच नाही तर इतर देशांतही आहे. जागोजागी दिसणारे हे खड्डे आपण पाहून याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो मात्र यात काही रहस्यमयीदेखील असून शकते, असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का?
अमेरिकेत खड्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे, ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. यात, एक व्यक्ती फूटपाथवरून चालत असताना चुकून एका खड्डा पडत असलेल्या जागेवर त्याचा पाय पडतो आणि ती जागा खचू लागते. यानंतर पुढे पाऊल टाकताच दगड आत जातो आणि आत खाली पडतो. यानंतर अचानक त्याजागी एक मोठा खड्डा तयार होतो. मात्र इथवर सर्वच सामान्य आहे मात्र यांनतर जे घडते त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
हेदेखील वाचा – Viral Video: दैवानं छळलं अन् परिस्थितीनी झोडपलं! महाराष्ट्रातल्या ST स्टँडवरील दिव्यांगाची अवस्था पाहून काळीज हळहळेल
मोठा खड्डा पडताच हा व्यक्ती कुतूहल म्हणून या खड्ड्याच्या आत डोकावून पाहतो तर त्याला आत अनेक विचित्र गोष्टी दिसू लागतात, ज्यांना पाहून त्याला धक्का बसतो. आतील जागा आपल्या कल्पनेपेक्षा मोठी असते. याकडे बघून असे वाटते, जमिनीच्या आत खाली जणू जणू एक वेगळे जगच वसले आहे. यात दिसलेले सर्वच दृश्य भारावून टाकणारे आहेत.
या अद्भुत दुसऱ्या जगाचा व्हिडिओ @decayingmidwest नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ न्यूयॉर्क शहरातील आहे. हा व्हिडिओ या वर्षीच्या जानेवारीतील आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सुमारे 16 आठवड्यांपूर्वी, म्हणजे सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी, केसी नेस्केप नावाचा माणूस होता. फुटपाथवरून चालत असताना अचानक त्याला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एक रिकामा बोगदा दिसला.
पायाने दगड खाली पडला आणि याखाली पाहिले तर एक वेगळेच जग समोर आले. आत एक बोगदा होता ज्यात अनेक पाईप्स होते. मग त्याला कोणाकडून तरी कळलं की न्यूयॉर्कच्या खाली बोगद्यांचे जाळे आहे. जेव्हा व्हिडीओ बनवणारे लोक या बोगद्यात गेले तेव्हा त्यांना मोठे हॉल आणि विचित्र खोल्या दिसल्या जिथे दिवे जळत होते. याशिवाय एक खोली दिसली ज्यामध्ये अनेक जुने संगणक ठेवलेले होते आणि त्यातही दिवे होते. या व्हिडिओला 3 कोटींहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकजण हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत.