तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता...! गणपती उत्सवानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
महाराष्ट्राचे आराध्यदैवत गणपती बाप्पाचे आगमन यंदाच्या वर्षी २७ ऑगस्टला होणार आहे. संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे आगमन होणारे आहे. ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन केले जाते.बाप्पा येणार म्हणून अनेक घरांमध्ये मोठी तयारी केली जाते. मोदक, बाप्पाची आरास, मखर इत्यादी अनेक गोष्टी केल्या जात आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश चतुर्थी सण साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला गणेश चतुर्थीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचवून सगळेच आनंदी होतील. चला तर जाणून घेऊया मराठमोळ्या शुभेच्छा.(फोटो सौजन्य – istock)
जली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोनासारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना…
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…!!!
तुमच्या आयुष्यातील आनंद,
गणेशाच्या उदराइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान होवो,
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो,
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो,
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना…
सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले,
दुःख आणि संकट दूर पळाले,
तुझ्या भेटीची आस लागते,
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते,
गणेश चतुर्थीला भेट घडते…
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते…
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
माझे गणराय…
येतील गणराज मुषकी बैसोनी,
स्वागत करुया तयांचे हसोनी,
आनंदे भरेल घर आणि सदन,
घरात येता प्रसन्न गजवदन,
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका,
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका,
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती,
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती,
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती,
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती…
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गणराया तुझ्या येण्याने सुख, समृद्धी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीवार्द राहू दे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तूच सुखकर्ता तूच दु:खर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा चरणी ठेवितो माथा गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
आपल्यामनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयागणेश चतुर्थी शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनलाश्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना
सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा