
Shocking Viral Video
तुम्ही कधी विचार केला आहे का लग्नात जे एवढं मोठ्या प्रमाणात जेवणं बनवले जाते ते कसे बनवले जाते, हजारो लोकांसाठी चपात्या बनवण्याचे पीठ कसे मळले जाते. नसले तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याचा अंदाज नक्कीच येईल. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, स्वयंपाक बनवण्याचे कक्ष दिसत आहे. इथे एका भांड्यात मोठ्या प्रमाणात पीठ दिसत असून दोन व्यक्ती त्यामध्ये पाय टाकून ते मळताना दिसत आहेत. हे किळसवाणे दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच उलटीसारखे वाटले. तसेच तुमच्या तळपायाची आगही मस्तकात जाईल. दोघेही बराच वेळ त्या पीठात पाय टाकून ते मळत आहे. शिवाय नंतर घाणा हांतांनी ते पाठीचा मोठा पुरीसारखा आकार करुन तळला जात आहे. सर्व परिसरही अस्वच्छ वाटत आहे.
व्यक्तीने खारुताई सोबत केलं लंच! खास मैफिलीचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
हां भाई…खालो पूड़ियां pic.twitter.com/Spu6IaseGm — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) November 30, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnathNagrik या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने मी पहिल्यांदाच पीठ मळण्याची अशी पद्धत पाहिली आहे, तर दुसऱ्या एकाने आता कळाले की मेजवानीत पुऱ्या एवढ्या स्वादिष्ट का असतात. अनेकांनी स्वच्छतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी एवढ्या लोकांचे जेवण बनवणे सोपे नसते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संतापजनक! कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन; वर्णावरुन शिवीगाळ केला अन्…, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.