(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज लोक फार मजा घेऊन पाहतात, ज्यामुळे फार कमी वेळेत ते व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर बिबट्याच्या हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक बिबटा अचानक स्वीमिंग पूलमध्ये घुसून लोकांवर हल्ला करताना दिसून आला. कोणाच्याही ध्यानी ना मनी असताना हा सर्व प्रकार घडला ज्यामुळे लोक यामुळे खूप घाबरले आणि सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात बिबट्याने अनेकांचा चावा देखील घेतला. त्याच्या या थरारक हल्ल्याचा व्हिडिओ पाहून आता अनेक युजर्स आवाक् झाले आहेत.
नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक बिबटा अचानक स्विमिंग पूलमध्ये शिरताना दिसत आहे. लोक स्विमिंग पूलचा आनंद लुटत असताना ही घटना घडून आली. बिबट्याला पाहताच उपस्थित सर्व लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले आणि एकंदरीत यामुळे तिकडे एकच धुमाकूळ माजला. बिबट्याने अचानक येऊन सर्व लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक लोकांवर जीवघेणे हल्लेही केले.
काळाचा घात: बाईकची डिवाइडरला जोरदार धडक, हवेत उडाले अन् जागीच… मृत्यूचा थरारक Video Viral
बिबट्या अतिशय आक्रमक असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला पाहिल्यानंतर सर्वजण घाबरले. त्याच्या या हल्ल्याने स्विमिंग पूलमध्ये गोंधळ उडाला आणि सगळीकडे लोकांची धावपळ सुरू झाली. काही लोक घाबरून इकडे-तिकडे धावत होते. अखेर सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बिबट्यावर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी मिळून त्याला स्विमिंग पूलमधून बाहेर काढले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक या घटनेबाबत विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एकीकडे लोक त्या व्यक्तीच्या शौर्याचे कौतुक करत होते, तर दुसरीकडे अचानक बिबट्याच्या प्रवेशावरही प्रश्न उपस्थित केले जात होते.
बिबट्याच्या या हल्ल्याचा व्हिडिओ @junglefootprint नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ख्रिसमसची पार्टी करायला तो आला असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.