Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात खरा सुपरहिरो! मुलाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर मारली उडी अन् मग जे घडलं… सीसीटीव्ही फुटेज Viral

Real Life Hero : दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. समोरुन येणारी भरधाव ट्रेन आणि रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या मुलाला पाहताच रेल्वे कर्मचाऱ्याने धाव घेतली अन् अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचत मुलाचा जीव वाचवला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2026 | 11:50 AM
याला म्हणतात खरा सुपरहिरो! मुलाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर मारली उडी अन् मग जे घडलं... सीसीटीव्ही फुटेज Viral

याला म्हणतात खरा सुपरहिरो! मुलाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर मारली उडी अन् मग जे घडलं... सीसीटीव्ही फुटेज Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे ट्रॅकवरील एका धोकादायक प्रसंगाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • प्रसंगावधान राखत एका व्यक्तीने जीवाची पर्वा न करता धाडसी निर्णय घेतला.
  • या कृतीचे नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत असून संबंधित व्यक्तीला सन्मान देण्याची मागणी होत आहे.
अनेक चित्रपटांमध्ये हिरोला लोकांचा जीव वाचवताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण खऱ्या आयुष्यात अशा हिरोला तुम्ही कधी पाहिलंय का? आजच्या धावपळीच्या युगात लोक आपल्या व्यस्त जीवानात इतके रमून गेले आहेत की आजूबाजूला काय सुरु आहे याचेही त्यांना भान नसते. बऱ्याचदा तर एखाद्याचा जीव धोक्यात असल्यास लोक त्याला मदत करायला पुढे जात नाही तर त्या दृष्यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी फक्त आपल्या खिशातून स्मार्टफोन बाहेर काढतात. पण म्हणतात ना अजूनही काही लोकांमध्ये माणूसकी शिल्लक आहे आणि याच माणूसकीच्या जोरावर एका व्यक्तीने खऱ्या आयुष्यात आपला जीव धोक्यात घालून एका मुलाची मदत करु पाहिली. याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल झाले असून घटनेत पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

प्रेम असावं तर असं! पावसाने मंडप बुडाला, तरी वराने फिल्मी स्टाईलमध्ये वधूला कडेवर घेत पूर्ण केले सात फेरे; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही तामिळनाडूतील सेरकाझीजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर करण्यात आला ज्यानंतर काही तासांतच व्हिडिओला हजारो यूजर्सच्या व्हूज मिळाल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, रेल्वे गेटकीपर रेल्वे ट्रॅकच्या किनाऱ्यावर उभं राहून नेहमीप्रमाणे आपली ड्यूटी करत असतो. अशातच अचानक त्याची नजर रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या एका मुलाजवळ जाते. मुख्य म्हणजे यावेळी समोरुन भरधाव वेगात ट्रेन येत असते. अशात रेल्वे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता लगेच मुलाजवळ जाऊन त्याला रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला खेचतो आणि त्याचा जीव वाचवतो. हा सीन कोणत्या चित्रपटाच्या सीनहून कमी नसतो, कारण ज्यावेळी रेल्वे कर्मचारी मुलाला दुसऱ्या बाजूला खेचतो, बरोबर त्याच्या काही सेकंदानंतरच तिथून ट्रेन पुढे निघून जाते. याचाच अर्थ काही सेकंदाचा जरी विलंब झाला असता तर निश्चितच या अपघातात मुलाचा बळी जाण्याची शक्यता होती.

सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाचे काैतुक केले आहे. तसेच काहींनी त्याला पुरस्कार जाहीर करावा अशीही मागणी केली आहे. घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, ‘तामिळनाडूतील सिरकाझीजवळ वेगवान ट्रेनच्या काही सेकंद आधी एका रेल्वे गेटकीपरने आपला जीव धोक्यात घालून एका माणसाला वाचवले’.

Railway Gatekeeper Risks His Life to Save Man Seconds Before Speeding Train Near Sirkazhi in Tamil Nadu pic.twitter.com/DJOQhUbnqd — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 9, 2026

एआय की निसर्गाचा चमत्कार! हत्तीने वाचवले वाघाचे प्राण, दृष्य पाहून यूजर्सना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “तो खरा नायक आहे, त्याने मोठ्या धैर्याने एका व्यक्तीचा जीव वाचवला.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुसरा माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता आणि तो तारणहार म्हणून आला”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आदर! या द्वारपालाने क्षणभरही विचार न करता एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी थेट मृत्यूला सामोरा धाव घेतली. याला म्हणतात खरा पराक्रम. संदीप चहर, संपूर्ण भारत तुम्हाला सलाम करतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tamil nadu railway gatekeeper brave act saves life seconds before speeding train video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
1

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral
2

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
3

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
4

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.