(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
पाण्याने मंजप भरला आहे, जसा विचार केला तसे लग्न होऊ शकत नाही असा विचार करत वर-वधू आपले लग्न पुढे ढकलू शकत होते. परंतु त्यांनी अस काहीच केलं नाही. लग्न ठरल्या दिवशी, आहे त्या परिस्थितीत होणार असा निर्धार ठेवत वराने फिल्मी स्टाईमध्ये मंडपात एंट्री घेतली. मंडपाच्या आजूबाजूला पाणी साचल्याने वराने वधूला कडेवर उचलंल आणि दोघांनी हसत हसत मंडपात एंट्री घेतली. त्यांच्यातील प्रेम पाहून आता यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू खुलत आहे. मनात जिद्द असेल तर कठीण काळातूनही आपण मार्ग कसा काढू शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने व्हिडिओवर काैतुकांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral
मागील काही दिवसांपासून इंदूरमध्ये पावासाचा वेग इतका वाढला आहे की, जुलै महिन्यातील सरासरी पाऊस फक्त एकाच आठवड्यात पडून गेलाय. असं असूनही जोडप्याने आपले लग्न टाळले नाही तर तर आहे त्या परिस्थितीत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच चर्चेत असून @rvcjinsta नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याला शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “माझी प्रार्थना आहे की तुम्ही नेहमी आनंदी राहावे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही सुंदर आठवण ते आपल्या मुलांना रंगवून सांगतील”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दिवसभरात मी पाहिलेली सर्वोत्तम पोस्ट”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






