Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! स्वागतासाठी नवरदेवाला घालण्यात आला १०० फूट लांब ५०० रुपयांच्या नोटांचा हार, राजस्थानच्या लग्नसमारंभातील Video Viral

Wedding Video : लग्नात पैसा बोलला! राजस्थानच्या लग्नात वराचा हार ठरला लक्षवेधी. तब्बल १०० फूट लांब आणि ५०० रुपयांच्या या भल्यामोठ्या हाराला घालण्यासाठी वराला छतावर जाऊन उभे राहावे लागले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 25, 2026 | 02:39 PM
अबब! स्वागतासाठी नवरदेवाला घालण्यात आला १०० फूट लांब ५०० रुपयांच्या नोटांचा हार, राजस्थानच्या लग्नसमारंभातील Video Viral

अबब! स्वागतासाठी नवरदेवाला घालण्यात आला १०० फूट लांब ५०० रुपयांच्या नोटांचा हार, राजस्थानच्या लग्नसमारंभातील Video Viral

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानातील लग्नात नवरदेवाला १०० फूट लांबीचा नोटांचा हार घालण्यात आला.
  • हार इतका मोठा होता की तो सांभाळण्यासाठी अनेक लोकांची मदत घ्यावी लागली.
  • व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.
लग्न म्हटलं की लग्नात सोहळे, स्वागतसामारंभ, आदरातिथ्य या गोष्टी आल्याच. त्यातही भारतात लग्नसमारंभात नेहमीच काहीतरी वेगळं केलं जातं. मागील काही काळापासून लग्नाचे नवनवीन ट्रेंड्स झपाट्याने वाढत असतानाच आता यासंबंधित नवीन व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओचे खास आकर्षण ही वराच्या गळ्यातील माळ ठरली आहे. अनेक ठिकाणी वराचे स्वागत करताना त्याच्या गळ्यात माळ घातली जाते. आता काही ठिकाणी ही माळ फुलांची तयार करण्यात येते तर काही ठिकाणी ही माळ पैशांची तयार केली जाते. राजस्थानमध्ये मात्र वरासाठी एक आगळीवेगळी पैशांची माळ तयार केल्याचे दिसले ज्याने सर्वांचेच डोळे दिपवून टाकले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण यात वरासाठी तब्बल १०० फूट लांबीची ५०० रुपयांची माळ तयार करण्यात आली होती. चला नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया.

“आई कधीच परतली नाही तर…” त्या प्रश्नावर चिमुकला झाला भावूक, दिले असे उत्तर की यूजर्सनाही अश्रू झाले अनावर; Video Viral

नक्की काय घडलं ?

माहितीनुसार ही घटना राजस्थानच्या डीग येथील एका लग्नसमारंभात घडून आली. यामध्ये नवरदेवाने ५०० रुपयांच्या नोटांचा एक भलामोठा हार घातला होता. मुख्य म्हणजे त्याची लांबी इतकी जास्त होती की या हाराला घालण्यासाठी वराला छतावर जाऊन उभे रहावे लागले. छतापासून जमिनीपर्यंत हा हार पसरल्याचे दिसले, यावरुनच आपण याच्या लांबीचा अंदाज लावू शकतो. हा इतका मोठा हार होता की अनेक लोकांना मिळून त्याला सांभाळावे लागले. हे असे भव्य देखावे अनेकदा प्रादेशिक परंपरांशी जोडलेले असतात, जिथे लग्नाला प्रतिष्ठा आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. हा व्हिडिओ पुन्हा एकदा अधोरेखित करतो की आधुनिक सोहळे परंपरा आणि ऐश्वर्य यांचा मेळ कसा घालत आहेत.

शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral

स्थानिकांच्या मते, हे एका लग्नसमारंभातील दृष्य होते. सांगितले जात आहे की, हा हार ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांपासून तयार करण्यात आला होता आणि त्याची लांबी १०० फूट एवढी होती. हे लग्न १९ एप्रिल रोजी पार पडले आणि त्यावेळीच नवरदेवाला हा भलामोठा पैशांचा हार घालण्यात आला. गावचे सरपंच यांनी सांगितले की, हा हार घालणे ही एक स्थानिक परंपरा असून, तो खास या प्रसंगासाठी मागवण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ @bharatvars_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरत असून यूजर्स यातील दृष्ये पाहून अवाक् झाले आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The groom was wearing 100 foot long garland made of 500 rupees notes rajasthan wedding goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • rajasthan
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.