(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आई आपल्या साडे तीन वर्षांच्या मुलाला प्रश्न करताना दिसते. ती म्हणते की, “जर आई निघून गेली आणि परत आली नाही तर तू काय करशील?” यावर सुरुवतीला मुलगा म्हणतो की, “मी तुझ्या फोटोवर प्रेम करीन.” पण काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागतात. जेव्हा आई त्याला विचारते की, तू का रडत आहेस तेव्हा तो आणखी भावूक होऊन म्हणतो की, “तू मरणार का? मी देवाकडे प्रार्थना करेन की माझी आई लवकर परत येऊ दे”.
मुलाला भावूक झालेलं पाहून अखेर आई त्याला धीर देताना दिसते आणि सांगते की त्याला सोडून कुठेही जाणार नाही. यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. व्हिडिओचा शेवट दिलासादायक असला तरी मुलाच्या उत्तराने सोशल मिडिया यूजर्सना भावूक करुन सोडलं. त्या प्रश्नाने त्याला किती त्रास झाला असावा या भावनेने यूजर्स अस्वस्थ झाले आणि लोकांनी या कमेंट्समध्ये या घटनेविषयी संताप व्यक्त करायला सुरुवात केली.
हा व्हिडिओ @wiggle_bear_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्याच्या जगात त्याला सर्व काही मिळू शकते… पण त्याच्या आईशिवाय काहीही नाही, असं प्रेम, ज्याला ‘हरणं’ समजतच नाही… ते फक्त तुला परत मिळवण्यातच विश्वास ठेवतं.’ व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्र्या व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “मला रडायला आलं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया करुन असं काही करु नका, त्याचा निरागस चेहरा तर पाहा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कृपया असे कधीही म्हणू नका, ज्यांना आई नाही त्यांना याचा खूप त्रास होतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






