
फोटो सौजन्य सोशल मिडिया
खोजागिरी पोर्णिमेच्या दिनानिमित्त गेलेल्या भाविकांना सुरक्षा दला कडुन धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ समोर आला. दर्शन घेण्याआधी धक्काबुक्की करण्यात आली आहे. असे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाविकांमार्फत करण्यात येत आहे.
तासन तासं रांगेत ऊभे राहून सुद्धा भाविकांना अशा प्रकारची वागणुक मिळत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहेत. सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे भाविकांचे म्हणणे आहे.
धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री तुळजाभवानी मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोजागिरी पौणिमेच्या दिवशी भाविकांना झालेल्या धक्काबुक्कीचा आणि सुरक्षारक्षकांच्या वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मंदिर प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
#Maharashtra के धाराशिव जिले तुलजा भवानी मंदिर में महाराष्ट्र सिक्योरिटी फोर्स (MSF) के जवानों द्वारा भक्तों के साथ गर्भगृह के अंदर बुरे बर्ताव और धक्कामुक्की करने का वीडियो सामने आया..जिसको लेकर भक्तों में भारी नाराज़गी है@TNNavbharat@DharashivPolice pic.twitter.com/dKQ3r2HzaF — Atul singh (@atuljmd123) October 27, 2026
याआधी सुद्धा पोलीस आणि सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते तुळजा भवानी मंदिरातील ‘पितळी दरवाजा’ येथून प्रतिबंधित प्रवेश देण्यास नकार दिल्यामुळे मंदिर संस्थानचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला होता. पोलिसांनी सुरक्षारक्षकाला कथितपणे मारहाण केल्याने त्याचे डोके फुटले होते, या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
आता तुळजा भवानी मंदिरातील सुरक्षारक्षकांकडून भाविकांना उद्धट वागणूक देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पोलीस-सुरक्षारक्षकांमधील अंतर्गत वाद, या दोन्ही प्रकरणांचे व्हिडिओ समोर आल्याने मंदिर प्रशासनाच्या सुरक्षेचा आणि गर्दी व्यवस्थापनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या मुळे प्रशासन पूर्णपणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाविकांनी आणि स्थानिक संघटनांनी अशा उद्धट कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगविषयक कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.
Bull Viral Video: चिखलात अडकली कार, अन् बैलाने केली मदत! VIDEO पाहून नेटकरीही थक्क