Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका! प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला कडक आदेश

Pratap Sarnaik : दुष्काळ, नापिकी आणि शेतीमालाला कमी भाव मिळत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 25, 2026 | 05:49 PM
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीबाबत पालकमंत्र्यांचे निर्देश
  • तलाठी आणि कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाणार
  • शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाईचा इशारा
 

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : दुष्काळ, नापिकी, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये. पीक विमा आणि अन्य कर्जांसंदर्भात शासनाचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांवर अनावश्यक दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे समुपदेशन करावे, त्यांना धीर द्यावा आणि आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असेही त्यांनी बजावले. (Pratap Sarnaik)

नांदेड जिल्ह्यात बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने अधिकाऱ्यांकडून वारंवार तगादा लावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

तलाठी, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जावे

दुष्काळी परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेतीचे नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी वारंवार तगादा लावणे, दबाव आणणे किंवा मानसिक त्रास देणे टाळले पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली.

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

जिल्ह्यात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या घरी तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे समुपदेशन करावे, त्यांना धीर द्यावा आणि उपलब्ध शासकीय योजनांची माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या मानसिक सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासगी सावकारांच्या पिळवणुकीवर कारवाई करा

कर्जवसुलीसाठी खासगी सावकारांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित सावकारांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दबाव आणून त्यांची पिळवणूक होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित यंत्रणांना सूचना देण्याचे निर्देश

पीक विमा आणि अन्य कर्जांसंदर्भात शासनाकडून निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांवर अनावश्यक दबाव आणला जाणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संबंधित विभाग, बँका आणि वसुली यंत्रणांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

परभणी आणि नांदेडसह अन्य जिल्ह्यांमध्ये कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

शेतकऱ्यांचे जीवन आणि मानसिक सुरक्षितता महत्त्वाची आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही शेतकऱ्यावर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून त्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

Web Title: Dharashiv farmers loan recovery pratap sarnaik orders vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • drought news
  • Farmers Issues
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती
1

Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

Dharashiv News :भगर खाल्ल्याने २५ जणांना विषबाधा; एफडीएच्या पथकाला दुकानच सापडेना!
2

Dharashiv News :भगर खाल्ल्याने २५ जणांना विषबाधा; एफडीएच्या पथकाला दुकानच सापडेना!

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश
3

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश

Buldhana: बुलढाण्यात पुढील ५ दिवस कोरडे हवामान; रब्बी पिकांसाठी कृषी हवामान केंद्राचा महत्त्वाचा सल्ला
4

Buldhana: बुलढाण्यात पुढील ५ दिवस कोरडे हवामान; रब्बी पिकांसाठी कृषी हवामान केंद्राचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.