US Mayors dance on bollywood songs at Diwali Celebration video goes viral
Diwali Celebration in America : वॉशिंग्टन : आपली भारतीय संस्कृती आज जगभरातील लोकांना भूरळ घालत आहे. सध्या देशभारत दिवळाचा उत्सव साजरा केला जात आहे. पण आपल्या भारतताच नाही, चर परदेशातही दिवळाची धूम आजकाल पाहायला मिळते. परदेशी लोकही आनंदाने उत्साहने दिवाळी साजरी करतात. अमेरिकेतही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये धूमधडाक्यात दिवाळीचे सेलिब्रेशन करण्यात आले आहे.
एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कॅरोलिनाचे महापौर हॅरोल्ड वेनब्रेक्ट आणि मॉरिसव्हिलचे महापौर टीजे कोली यांनी दिवाळीच्या आनंदात सहभाग घेतला आहे. दोन्ही महापौरांनी बॉलीवूड गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत आहे. लोकांनी याला भारतीय सांस्कृतिक सौहादार्याचे प्रतीक म्हटले आहे. हा व्हिडिओ लोकांनी खूप आवडत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
कॅरोलिनामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरेला साजरे करण्यासाटी हम सब के नाम या स्वयंसेवी संस्थेने एका कार्यक्रमाचे आजोजन केले होते. या कार्यक्रमात वॉलीवूड संगीतावर लोकांनी डान्स केला. यामध्ये अमेरिकेच्या महापौरांनी देखील चुनरी-चुनरी गाण्यावर डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी कौतुकांचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने हे पाहून डोळ्यात पाणी आले असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अशीच आहे आमची भारतीय संस्कृती लोकांना आपले करुन घेणारी असे म्हटल आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.