Video of young man abusing and beating girl after she rejected his proposal goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असून सोशल मीडियावर प्रेमी युगलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काल व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे होता. या निमित्ताने अनेकांनी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले आणि गिफ्ट दिले असेल. काहींना यात यश मिळाले असेल तर काहींच्या पदरी निराशा आली असेल. पण अनेकदा या निराशेच्या पोटी मुलं असे काहीतरी की, पाहून संताप येतो. सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रपोज डे दिवशी एका तरुणाने मुलीला प्रपोज केले पण त्याला निराशा हाती लागली. त्यानंतर त्याने असे काहीतरी केले आहे की यामुळे तरुणी रडू लागते. तरुणीने नकार देताच हा तरुण तिला शिवीगाळ करतो आणि मारहाण करतो. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या आमरोहा जिल्ह्यातील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. तरुणाने मुलीने नकार दिल्याने तिच्या कानाखाली लावली, तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर केके फेकून मारल्याची घटना घडली आहे.
अनेकांनी हा व्हिडिओ पाहून तरुमावर कारवाईची मागणी केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आपल्या मित्रांसोबत कार घेऊन मुलीकडे गेला आहे. तो मुलीला प्रपोज करतो, आणि त्यानंतर तिला केक चारायला जातो. मात्र, तरुमी केक खाण्यास नकार देते. यामुळे तरुणाला राग येतो. रागाच्या भरात तरुण तिच्यावर केके फेकतो. तिच्या कानाखाली मारतो आणि शिवीगाळ करतो. आश्चर्याची बाब म्हणजे तरुणीला मारहाण सुरु असतानवा तरुणाचे मित्र त्याला अडवत नाही. तर फोनमध्ये रेकॉर्ड करत असतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
UP के अमरोहा जिले के गजरौला मे सरे राह लड़की को प्रपोज़ करने वाले युवक ने इंकार के बाद लड़की के साथ गाली गलौच करते हुए मारपीट की। जिसकी वीडियो वायरल होने के बाद पुलिस ने FIR दर्ज कर ली हैं।#viralvideo #ValentinesDay pic.twitter.com/JpWMTOhnWr
— TRUE STORY (@TrueStoryUP) February 8, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TrueStoryUP या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी इतकी नाराजी का असा प्रश्न उपस्थित केला आहे. हा व्हिडिओसध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत असून तरुण आणि त्यांच्या मित्रांवर कारवाईची मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागलाताच तरुणांवर कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.