
25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
अजित पवारांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आणि यातीलच एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे ज्योतिषाच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ. व्हिडिओमध्ये ज्योतिष माणूस म्हणतो की, “तुम्हाला दिसेल की फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुमारास भारतात विमान अपघात होईल. मी एक भाकीत करत आहे, आणि ते खरे ठरेल. तुम्हाला सांगणे माझे काम आहे. आता तुम्ही ते थांबवा.” हा व्हिडिओ २ जानेवारीच्या आसपासचा असल्याचे सांगितले जात आहे, त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की अजित पवार यांच्या मृत्यूची भविष्यवाणी त्यांच्या मृत्यूच्या २५ दिवस आधी करण्यात आली होती.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. विमानातील सर्व पाच प्रवाशांचाही मृत्यू झाला. दरम्यान सांगितले जात आहे की, अजित पवारांच्या घड्याळ्यावरून त्यांच्या मृतदेहाची ओळख करण्यात आली. यावरूनच या दुर्घटनेच्या भीषणतेची आपण कल्पना करू शकतो. हा व्हिडिओ @astrologerankittyagiofficial नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “झाला अजित पवारांचे विमान कोसळले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कालच व्हिडिओ पाहिला आणि आज समजलं की अजित पवारांचे विमान क्रॅश झाले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे यांनी कसे काय ओळखले?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.