(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पोर्तुगालचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘पोर्तुगीज शहरातील एका रेड वाईन बनवणाऱ्या भट्टीतील टाकीचा स्फोट झाल्याने सुमारे २२ लाख लिटर वाईन वाहून गेली.वाईनचे प्रमाण इतके प्रचंड होते की ते पूर आलेल्या नदीसारखे दिसत होते’. व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर रेड वाईनचे प्रमाण इतके प्रचंड आहे की रस्ते आणि गल्ल्या नद्यांसारख्या दिसतात. रेड वाईन सर्वत्र वाहत आहे, ज्यामुळे असे दिसते की रेड वाईनचा पूर परिसरात आला आहे. वाइन साठवणूक टाक्या दाब सहन करू न शकल्याने अचानक हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. काही मिनिटांतच लाखो लिटर वाइन बाहेर पडू लागले. स्थानिकांनी हे दृश्य त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुर्तगाल के एक शहर में Red Wine 🍷 बनाने वाली भट्टियों का टैंक फटने से तकरीबन 22 लाख लीटर वाइन बह गई। यह वाइन की मात्रा इतनी अधिक थी कि बहते हुए बाढ़ से प्रभावित नदी जैसी लग रही थी। pic.twitter.com/7GbnHOM9PB — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) January 27, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर ही घटना भारतात घडली असती तर सगळे भांडे घेऊन गेले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, पण ही वाइन चोरताना कोणीही दिसत नाही.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही खूप वर्षांपूर्वीची घटना आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






