(फोटो सौजन्य: X)
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे एक मोठा हिमस्खलन झाला. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यात हवामानाची तीव्रता स्पष्ट दिसून येते. सोमवार रात्रीपासून जम्मू आणि काश्मीरमधील हवामान बदलले असून तिथे सतत पावसाचा वर्षाव होत होता. हेच कारण आहे की, प्रदेशात हिमस्खलनाचा धोका वाढला आणि धोकदायक स्थिती निर्माण झाली. हिमस्खलनामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पण यात कोणतेही आर्थिक नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य धोक्याचे निरीक्षण करण्यासाठी आपत्कालीन पथके आणि स्थानिक अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला तर श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सततच्या बर्फवृष्टीमुळे रनवे ऑपरेशनसाठी असुरक्षित बनली आहेत. श्रीनगरसह खोऱ्यांमध्ये हलकी ते मध्यम बर्फवृष्टी झाल्यामुळे सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या पर्यटन स्थळांवर बर्फाचा जाड थर तयार झाला आहे.
काझीगुंड आणि बनिहाल दरम्यान बर्फ साचल्यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि बर्फ हटवण्याचे काम सुरू केले गेले आहे. यासाठी महामार्गावरून कोणत्याही वाहनांना जाण्याची परवानगी नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा रेल्वे सेवांवरही परिणाम झाला, बनिहाल आणि बडगाम दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या दिवसापूर्वी रद्द करण्यात आल्या. तथापि, ट्रॅक मोकळे झाल्यानंतर काही तासांतच वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






