रीलचा नाद आला अंगलट! धावत्या बाईकवर स्टंटबाजी करताना तरुणाचा तोल गेला अन्..., पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही तरुण मंडळी गावकडच्या रस्त्यांवर बाईक चालवत आहेत. मस्ती करताना दिसत आहे. यामध्ये एक तरुणाच्या अंगात जास्त खाज असते. हा तरुण बाईक चालवताना बाईकचे हॅंडल सोडून देतो. यानंतर दोन्ही पाय वर करुन झोपत गाडी चालवायला लागलोत. परंतु हा स्टंट तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. काही सेकंदातच तरुणाचा तोल गेला असून तरुण धापकन खाली आदळला आहे.
मागच्या गाडीवरील तरुण देखील पाय हवेत उचलून गाडी चालवत आहे. पुढचा तरुण आदळल्यानंतर मागच्याला गाडी थांबवता येत नाही आणि पडलेल्या तरुणाला जोरात धक्का देऊन पुढे जातो. यानंतर नेमकं काय घडलं हे माहित नाही. परंतु हे सगळे त्यांच्या मित्राने कॅमेरात रेकॉर्ड केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
Reels बन गया भाई, अब जाकर चप्पल ख़रीद लो, और दवा खरीद लेना,
Road safety कहां गया, pic.twitter.com/rXCmFgsIhK — TANVEER (@mdtanveer87) January 23, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @mdtanveer87 या अकाउंटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स अन् व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत कशाला उगाच हवा करायची असे म्हटले आहे. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे अशा स्टंटबाजीमुळे लोकांचा जीव जाउनही कोणीही सुधारण्याचे नाव घेत नाही. अशा स्टंटमुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असते, पण लोकांना याचे भान राहिलेले नाही. छोड्याशा लाईक्स आणि व्ह्यूज साठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






