(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये, पंच आणि त्याची गर्लफ्रेंड आपला सर्व वेळ एकत्र घालवताना दिसत आहेत. ते एकमेकांच्या बाजूला बसतात, एकमेकांना मिठी मारतात एवढंच काय तर एकमेकांना किस देखील करताना व्हिडिओत दिसून आले आहेत. सर्वांनी नाकारल्यानंतर पंचला नव्याने मिळालेले हे प्रेम पाहून यूजर्स भारावून गेले आहेत. एकाकीपणातून अखेर त्याची सुटका झाली आणि त्याच्यावरही जीवपाड प्रेम करणारं त्याला कुणी तरी मिळालं ही भावना यूजर्सच्या मनाला चांगलीच भिडली आहे. पंचचा हा नवा व्हिडिओ जपानमध्येच नाही तर संपूर्ण जगभर चांगलाच शेअर केला जात आहे.
हा व्हिडिओ @beyond_the_wildlife नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिची निवड खूप छान आहे. तो सर्वगुणसंपन्न आहे: देखणा, कणखर, कल्पक, काळजी घेणाऱ्या आणि दिलासा देणाऱ्या माकडाशी आणि आता एका सुंदर स्त्रीशीही जवळीक साधणारा. आशा आहे की तो तिचं मन मोडणार नाही. तो सगळ्यांनाच खूप आकर्षक वाटतो हे उघड आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती हास्यास्पद!! काल तर तो नुसता एक पिल्लू होता!! आज त्याला गर्लफ्रेंडही मिळाली! उद्या चक्क लग्न? त्या माकडाला माणसासारखे वागवणे आणि त्याचे व्यापारीकरण करणे थांबवा!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एका माकडाला प्रेम मिळालं, पण मला मात्र मिळालं नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






