
इंस्टाग्रामवर मैत्री, मग झालं प्रेमात रुपांतर; 4 मुलांची आई प्रेमीसोबत झाली फरार, पतीवर केले भयंकर आरोप म्हणाली... Video Viral
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका महिलेला दाखवण्यात आले आहे. महिलेचा विवाह झाला असून तिला एकूण 4 मुले आहेत आणि असं असतानाही महिलेने आपला संसार सोडून तिच्या प्रियकरासोबत पळ काढल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात घडली असून पती आणि सासऱ्याच्या विनवणीवर पळून गेलेल्या या बायकोला पोलिसांनी 25 दिवसांत पकडूनही आणले. पण यानंतर पत्नीने पतीविषयीचे धक्कादायक खुलासे केले जे ऐकून सर्वच अवाक् झाले. चला महिला काय म्हणाली ते जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
सांगण्यात येत आहे की, या महिलेचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही काळापूर्वी तिची इंस्टाग्रामवर बुलंदशहरमधील एका पुरूषाशी मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात बदलले आणि एके दिवशी ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आणि तिने त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. आपल्या चार मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेलेल्या या महिलेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणते की ती विवाहित आहे आणि तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. व्हिडिओमध्ये ती त्याच्यासोबत राहण्याची परवानगी मिळावी अशी विनंती करते. तिने तिच्या पतीवर शारीरिक छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. इतकंच काय तर व्हिडिओत महिलेने असाही आरोप केला की, तिचा पती घरी इतर पुरुषांना आणूनही तिच्यावर अत्याचार करतो. म्हणूनच तिला आता तिच्या पतीसोबत राहण्याची इच्छा नाहीये असा आरोप महिलेने केला आहे.
इस्टाग्राम पर प्यार, प्रेमी साथ फरार
यूपी एटा 4 बच्चों की मां प्रेमी संग हुई रफूचक्कर, इंस्टाग्राम पर हुई थी दोस्ती, ससुर और पति की शिकायत पर पुलिस ने महिला को 25 दिन बाद किया बरामद, महिला का आरोप पति शराब पीकर अन्य लोगों को रात में घर लाकर मुझसे छेड़छाड़ कराते थे, अब मैं साथ… pic.twitter.com/Udxu2eKX0b — Tushar Rai (@tusharcrai) November 4, 2025
महिलेने शेवटी सांगितलं की, तिला तिच्या मुलांना सोबत घेऊन जाण्याची इच्छा नाही तर तिला फक्त एकटं जाऊन तिच्या प्रियकरासोबत राहायचं आहे. महिलेचा हा व्हिडिओ @tusharcrai नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या बाईला लाज वाटली पाहिजे, मुलांच्या भविष्याचे काय होईल?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मुलांना घेऊन जायला हवं होत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.