(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे अशा अनेक गोष्टी शेअर केले जातात ज्यांना आपण याआधी कधीही पाहिलं नसेल. इथे असे अनेक दृश्य शेअर होतात जे आश्चर्याने भरलेले असतात. नुकताच सोशल मिडियावर एक असाच प्रकार व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच हैराण केलं. वास्तविक इंटरनेटवर एका विचित्र दिसणाऱ्या बेडकाचा फोटो शअर झाला आहे. मुख्य म्हणजे हा बेडूक इतर बेडकांप्रमाणे दिसत नसून त्याचे डोळे तो तोंडाच्या आत लपवून ठेवतो. पहिल्यांदाच ऐकायला आश्चर्य वाटेल, पण ही अफवा नाही तर विज्ञानाने सिद्ध केलेले सत्य आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कॅनडातील ओंटारियोमधील बर्लिंग्टन येथील हायस्कूलची विद्यार्थिनी डेड्रे तिच्या अंगणात खेळत असताना तिला हा विचित्र बेडूक दिसून आला. तिला या बेडकाचे डोळे दिसून येत नव्हते, तिला वाटलं की बेडकाने त्याचे डोळे मिटले आहेत पण सत्य काही वेगळंच होत. वास्तविक, बेडकाने डोळे मिटले नसून त्याचे हे डोळे त्याच्या तोंडात त्याने दडवून ठेवले होते. डीड्रेने जेव्हा बेडताच्या तोंडात चमकणारे दोन डोळे पाहिले तेव्हा ती घाबरली आणि जोरजोरात ओरडू लागली. डियर्ड्रेला वाटले की त्याने दुसरा प्राणी गिळला असेल, परंतु जवळून तपासणी केल्यावर असे दिसून आले की ते डोळे त्याचेच आहेत.
डेड्रेने बेडकाचे नाव लॉर्ड ऑफ द रिंग्जमधील “गोलम” या पात्राच्या नावावरून ठेवले, जो अंधारात राहत होता. तिने या असामान्य प्राण्याचे फोटो काढले आणि ते स्थानिक वृत्तपत्र, हॅमिल्टन स्पेक्टेटरला पाठवले. फोटोग्राफर स्कॉट गार्डनरला सुरुवातीला हा विनोद वाटला, पण जेव्हा त्याने ते पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्यांनी फोटो काढले, जे नंतर रेडिओ आणि वृत्तवाहिन्यांवर व्हायरल झाले. एक बेडूक जो सामान्य दिसत होता, पण जेव्हा त्याने तोंड उघडले तेव्हा त्यातील दृश्य पाहून सर्वांनाच भय वाटले.
एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral
बेडकाच्या तोंडात डोळे असण्यामागचे कारण काय?
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






