(फोटो सौजन्य: X)
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आई-वडिल मुलांच्या लहानपणापासूनच भरपूर कष्ट घेत असतात. मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी स्वत:च संपूर्ण आयुष्य ते समर्पित करतात. या सर्व गोष्टींमागे त्यांची फक्त एकच इच्छा असते की त्यांच्या मुलाने भविष्यात यशस्वी व्हाव, त्याच्या आयुष्यात काहीतरी करुन दाखवावं, स्वतःच्या पायावर त्याने उभं रहावं इतकी साधी त्यांची इच्छा असते. जेव्हा मुलं खरंच आीई-वडिलांच्या या इच्छेला सार्थकी लावतात तेव्हा त्यांना किती आनंद होत असेल ते शब्दात मांडता येत नाही. सोशल मिडियावर एक गोड व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यातील दृश्ये पाहून यूजर्सनाही आनंद झाला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या आई-वडिलांच्या हातात आपला पहिला पगार ठेवताना दिसतो. मुलाच्या कष्टाचे पैसे पाहताच आई-वडिलांकडून अशी रिॲक्शन येते जिला पाहून अनेकांच्या हसू खुलतं. चला व्हिडिओतील या दृश्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगा त्याच्या पालकांना आधी डोळे बंद करायला सांगतो आणि मग त्यांच्या हातावर आपला पहिला पगार ठेवतो. डोळे उघडताच जेव्हा त्याचे आई-वडिल या नोटा पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं, त्यांचा ऊर भरून येतो. मुलाच्या पगारीतील या नोटा किंवा ती रक्कम लहान असू शकते, परंतु ते कमवण्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागले असतील ते पालकांना स्पष्टपणे समजते. परिणामी, पैसे हातात ठेवताच पालक खूप आनंदी होतात, त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि गोड हसू असते. मुलाचे त्याच्या पालकांवरील प्रेम आणि त्यांचा आनंद पाहून, यूजर्स व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अवघ्या 33 सेकंदाच्या या व्हिडिओने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
First salary, straight to parents. Far from perfect but this is all I got. https://t.co/0sJE5YDQbn pic.twitter.com/DgUUWn9ZV8 — Aayushman Singh (@aayushman2703) November 3, 2025
व्हिडिओ साधा असला तरी यातील आनंद अनमोल आहे ज्यावर यूजर्स घायाळ झाले आहेत. व्हिडिओला @aayushman2703 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पहिला पगार, थेट पालकांना.परिपूर्ण नाही पण मला एवढेच मिळाले”. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पहिल्या पगाराची मजाच वेगळी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही आतापर्यंतची सर्वात चांगली भावना आहे, तिच्यापेक्षा चांगली कोणतीही भावना नाही, तुला अभिनंदन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप सुंदर आहे, तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी आनंद वाटला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






