(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक अंत्ययात्रा सुरू असून, चार जण मृतदेह खांद्यावर घेऊन बॉलिवूड गाण्यांवर नाचत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले इतर लोकही नाचताना दिसत आहेत आणि अंत्ययात्रेच्या अग्रभागी एक डीजे मोठ्या आवाजात फिल्मी गाणी वाजवत आहे. या यात्रेत सामील झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दुःख तर दिसले नाही पण एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह होता ज्याने लोकांना आश्चर्यचकित केलं. युजर्स अंत्ययात्रेतील हे दृष्य पाहून थक्क झाले तर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की नक्की अंत्ययात्रा आहे की लग्नाची मिरवणूक.
घटनेचा हा व्हिडिओ @bhotsidhainsaanhume नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जन्म हा एक उत्सव आहे, मृत्यू देखील एक उत्सवच आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असं दिसतंय की आजोबांमुळे संपूर्ण परिसराला त्रास होत होता म्हणून गेल्यावर सर्वांना आनंद झाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला आहे, मृत्यू हा एका उत्सवापेक्षा कमी नाही”.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की हिंदू धर्मात, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा चार जण त्यांची शवपेटी स्मशानभूमीपर्यंत घेऊन जातात. अंत्ययात्रा अत्यंत शांततेत निघते आणि लोक ‘राम नाम सत्य है’ (राम हे सत्याचे नाव आहे) असा जयघोष करतात. मात्र, या अंत्ययात्रेदरम्यान बॉलिवूडची गाणी वाजवली जात होती आणि जणू काही एखादा सणच आहे अशा थाटात सर्वजण नाचत होते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






