(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओच्या सुरुवातीलाच जर आपण पाहिले तर यात आपल्याला दिसते की, तरुण पाण्याची मजा लुटण्यासाठी पाण्यात उडी मारतो. पण पुढे जे घडते ते त्याच्या कल्पनेपलिकडचे ठरते. व्हिडिओमध्ये दिसते की, पाण्यात उडी मारुन जेव्हा व्यक्ती पाण्याच्या वर येतो तेव्हा त्याच्या मानेवर एक भलामोठा अजगर बसलेला असतो. अजगर शिकार करण्याच्या तयारीत असून तरुणाच्या गळ्याला वेढण्याचा तो प्रयत्न करत असतो. तरुणाला जेव्हा याची कल्पना येते तेव्हा तो लगेच पाण्यातच उभा राहून अजगराला आपल्या मानेवरुन दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे दृष्य सर्वांनाच घाबरवून सोडते खरे पण यात व्यक्तीची नक्की सुटका होते की नाही ही बाब मात्र गुलदस्त्यातच राहते.
थेट मृत्यूशी गाठ! सापाशी पंगा घेणं पठ्ठ्याला पडलं महागात; कोब्राने फणा काढला अन्…, VIDEO VIRAL
दरम्यान हा व्हिडिओ @_naughtyfamily नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिहार असेल तर सर्व शक्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तरुणाच्या हिमतीची दाद द्यायला हवी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण नक्की तो अजगराच्या तावडीतून सुटला की नाही?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






