Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

Women Stunt Video : रेल्वेच्या प्रवासालाच बनवलं फायनल डेस्टिनेशन चॅलेंज! अलिकडेच महिलेच्या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात ती चालू ट्रेनच्या दरवाजाला लटकताना दिसली. लोकांनी महिलेच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 01:30 PM
रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काहीजण धोक्याची मर्यादाच ओलांडताना दिसत आहेत.
  • काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी घेतलेला एक चुकीचा निर्णय मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतो.
  • व्हायरल झालेल्या एका कृतीने इंटरनेटवर सुरक्षेबाबत आणि जबाबदारीबाबत नवी चर्चा सुरू केली आहे.
आजकाल रिलसाठी लोक इतके वेडे झाले आहेत की त्यांना स्वत:च्या आयुष्याचीही काळजी राहिली नाही. सोशल मिडियावर नेहमीच अनेक असे व्हिडिओज शेअर केले जातात ज्यात लोक व्हायरल होण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसतात. कधी कुणी धोकादायक स्टंट शेअर करत तर कुणी नवीन काही करण्याच्या प्रयत्नात काही आगळे-वेगळे प्रकार करताना दिसतात.

मरीन ड्राईव्हवर दिसला समुद्रातील रहस्यमय महाकाय जीव, रेस्क्यू टीम तातडीने दाखल; Video Viral

अलिकडेही असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात महिला धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकताना दिसली. काही क्षुल्लक व्यूज आणि लाईक्ससाठी तिने आपला जीव पणाला लावला. हे दृष्य इतके थरारक होते की पाहणाऱ्या अंगावर काटा आला. महिलेची एक चूक तिचा जीव घेऊ शकली असती पण सुदैवाने व्हिडिओत असं काहीही झालं नाही. व्हिडिओ व्हायरल होताच महिलेच्या या कृतीवर लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. चला व्हिडिओविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ धावत्या ट्रेनमध्ये शूट करण्यात आला आहे. यावेळी एक महिला ट्रेनच्या दरवाजाला लटकताना दिसते. तिने आपल्या दोन्ही हातांनी दरवाजाला पकडलेले असते आणि तिचे संपूर्ण शरीर रेल्वेच्या बाहेर लटकत असते. ट्रेनला लटकत असताना ती म्हणते की, “अरे, मी ट्रेनमध्ये व्हिडिओ बनवत आहे, कोणी काही सांगेल का?”. तिचा हा स्टंट अनेकांना थक्क करतो तर काहींना तिच्या जीवाची काळजीही वाटू लागते. महिलेचा चुकून जरी हात किंवा पाय निसटला असता तर तिचा जीव जाण्याची शक्यता होती. काही सेकंद हा ड्रामा केल्यानंतर ती रेल्वेबाहेरील आपले शरीर आत घेते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.

हा व्हिडिओ आपल्याला दाखवतो की, आताच्या काळात लोक रिल्सच्या किती आहारी गेले आहेत. लोकांना आपल्या जीवाची पर्वा राहिली नाही तर रिल्सला किती व्यूज मिळाले याची त्यांना अधिक काळजी वाटते. चालू रेल्वेत असे धोकादायक प्रकार करणे चुकीचे आहे. रेल्वे नियमांनुसार असे केल्यास तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो.

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral

हा व्हिडिओ @pincky524 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अशांना तुरुंगात पाठवायला हवं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काकू, थोडी तरी लाज बाळगा, मागे पडल्यास खूप वाईट होईल” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे देवा, आजकाल काय काय बघावं लागत आहे…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral woman hangs out of moving train for reel viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
1

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
2

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral
3

बाईक की टाॅयलेट? तरुणाचा जुगाड इतका अनोखा की पाहून यूजर्सच्या भुवया उंचावल्या, Video Viral

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral
4

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.