Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एआय की निसर्गाचा चमत्कार! हत्तीने वाचवले वाघाचे प्राण, दृष्य पाहून यूजर्सना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

Elephant Saves Tiger : पूराच्या पाण्यात वाघ आणि हत्ती दोघेही वाईटरित्या अडकले. अशात हत्तीने पुढाकार घेत वाघाची मदत केली. अनेकांनी याला सुंदर दृष्या म्हटले तर काहींनी याच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत हा एआय जनरेटेड व्हिडिओ असल्याचे म्हटले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2026 | 08:43 AM
एआय की निसर्गाचा चमत्कार! हत्तीने वाचवले वाघाचे प्राण, दृष्य पाहून यूजर्सना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

एआय की निसर्गाचा चमत्कार! हत्तीने वाचवले वाघाचे प्राण, दृष्य पाहून यूजर्सना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पूरात अडकलेल्या दोन वन्य प्राण्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
  • व्हिडिओतील अनपेक्षित प्रसंग पाहून अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले.
  • काहींनी हा व्हिडिओ खरा मानला, तर अनेकांनी तो AI-जनरेटेड असल्याचा दावा केला.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी रडवतात तर कधी थक्क करुन जातात. अनेकदा इथे काही एआय जनरेटेड व्हिडिओ देखील शेअर केले जातात ज्यातील दृष्ये पाहून आपल्यावर थक्क व्हायला होते. अलिकडे असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून अनेकांनी याच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले. व्हिडिओमध्ये एक हत्ती वाघाची मदत करताना दिसला. शिकारी वाघाला हत्ती का बरं मदत करत आहे आणि वास्तवात खरंच असं घडून आलं आहे का? असे प्रश्न यूजर्सच्या मनात येऊ लागले. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्याचे दिसते. या पूरात जंगलाचा शिकारी वाघ आणि हत्ती हे दोघेही वाईटरित्या अडकलेले असतात. अशात हत्ती आपल्या उंची आणि विशाल शरीरामुळे पूरातही स्वत:ला सावरतो पण दुसरीकडे वाघ मात्र पाण्यात पूर्णपणे बुडत असतो. पाण्यात बुडत असताना वाघ एक नजर जवळ असलेल्या हत्तीवर टाकतो आणि हत्ती कोणताही विचार न करता लगेच आपली मदतीसाठी आपली सोंड पुढे करतो. साेंडेच्या मदतीने हत्ती वाघाला जवळ घेतो ज्यानंतर उडी मारत वाघ हत्तीच्या मस्तकावर जाऊन बसतो. यानंतर हत्ती वाघाला घेऊन एका सुरक्षित ठिकाणी जाताना दिसतो.

सोशल मिडियावर व्हायरल हे दृष्य इंडोनेशियातील सुमात्रा द्वीप येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोस्टमध्ये म्हटलंय की,नोव्हेंबरच्या अखेरीस आलेल्या एका विनाशकारी पूरादरम्यान ही घटना घडली. यात दावा केला गेला आहे की, पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या वाघाला हत्तीने यशस्वीरित्या वाचवले आणि त्याला पाण्याच्या वर खेचले. तथापि, इंटरनेटवर काहींनी या दृष्यांना एआय जनरेटेड असल्याचा दावा केला आहे. परिणामी, या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, त्याची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

हा व्हिडिओ @vinayshaarma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “हत्ती किती समजूतदार असतात… पण आपल्याच भक्षकाला (किंवा शिकारीला) एखादा हत्ती वाचवेल, अशी अपेक्षा तरी कोण करेल?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही सर्वात सुंदर गोष्ट आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दुर्दैवाने, हा एआय (AI) द्वारे तयार केलेला ‘डीपफेक’ आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral elephant saves tiger in flood video ai or real fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Elephant Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
1

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
2

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
3

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
4

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.