(फोटो सौजन्य: X)
वन विभाग आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सदर घटना रविवारी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. गावात राहणारे कालूभाई बोघाभाई परमार नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळ गाईंना चारा देण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी गवतामध्ये एक सिंहीण लपून बसली होती. अशात व्यक्तीला पाहताच सिंहीणीचे त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला इतका जबरदस्त होता की कालूभाई यांना काही करताच आलं नाही आणि याआधीच ते सिंहीणीच्या कचाड्यात अडकले.
अर्धा तास सुरू होता मृत्यूशी संघर्ष
व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, सिंहिणीने कालूभाईला जमीनीवर पटकल असून तो काही केल्या तिथून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. सिंहिणीने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचा पाय आणि जबड्यात त्याचा हात पकडला होता. मृत्यूच्या विळख्यात अडकलेला कालुभाई जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. हा सर्व गोंधळ ऐकूण गावकरीही घटनेस्थळी उपस्थित झाले. कुणूी हातात दगड घेतला, तर कुणी काठी घेऊन मदतीला पोहचलं. गावकऱ्यांनी सिंहीणीला पळवून लावण्यासाठी आरडाओरड करायला सुरुवात केली. पण इतकं करुनही सिंहीण जागची काही हलेना. साधारण अर्धा तास कालूभाई सिंहीणींपासून वाचण्यासाठी संघर्ष करत होता.
Brutal Lion Attack in Gujarat A massive lion viciously mauled a man in Garajiya village, Bhavnagar — smashing its powerful paw into his neck in a savage strike. Blood everywhere. The victim is fighting for his life in hospital. Terrifying viral video shows the horror. Forest… pic.twitter.com/U6nd38HbGo — Siraj Noorani (@sirajnoorani) July 6, 2026
अखेर झाली सुटका
या सर्व गोंधळात एक क्षण असा आला की, काही सेकंगासाठी सिंहींणीचे लक्ष दुसऱ्या ठिकाणी गेले. ती कालूभाईला सोडून जवळच बांधलेल्या गायीकडे गेली. यानंतर गावकऱ्यांनी कालुभाईला उचलून तिथून दूर नेले. त्याला तात्काळ पालिताना येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर उपचार करत आहे. त्याची प्रकृती सध्या गंभीर असली तरी वेळेत मिळालेल्या मदतीमुळे त्याचा जीव वाचवण्यास यश आले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून, गावकऱ्यांनी वनविभागाकडे सिंहिणीला तात्काळ पकडण्याची मागणी केली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






