(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
काही ठिकाणी पावसाने अतिवृष्टी केली असून महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अशाच अलीकडे महाराष्ट्रातूनच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यातील दृष्ये पाहून सर्वांना धक्का बसला. एचपीसीएलच्या पातालगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून तीन हजार गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत. ज्या प्रकारे सिलिंडर पाण्यात तरंगत होते, ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. यावरुनच पावसामुळे परिस्थिती किती बिघडली आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो.
दरम्यान या घटनेनंतर, पाण्यात वाहून गेलेले हे सिलेंडर कुणीही आपल्या ताब्यात घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. वाहून गेलेले सिलेंडर मिळाले की नाही किंवा त्यांच्या पुढे काय झालं याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Heavy rains in Raigad, Maharashtra, caused flooding at an LPG bottling plant. Around 3,000 gas cylinders were swept away into the Patalganga River. pic.twitter.com/j6jejtFAwj — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 9, 2026
सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हि़डिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आणखी करा की एलपीजीच्या किमतीत वाढ! खुद्द देवही याच्या विरोधात आहेत!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा कमी झाला नव्हता की काय, त्यात आता मान्सूनही आला आहे. दुसऱ्या एका विषयावर बोलायचं झालं तर, त्या महा-इन्फ्रास्ट्रक्चरला नक्की काय झालंय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “सरकार आता थेट पाण्यातून डिलिव्हरी करणार वाटतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






