प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले 'टाटा बाय बाय', VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लिफ्टमधले दृश्य दिसत आहे. एका वृद्ध पती-पत्नी लिफ्टमध्ये जात आहेत. याच वेळी लिफ्टमध्ये कोणालाही न पाहून आजोबांना रोमान्स सुचतो. ते आजीला जवळ घेतात आणि किस करायला जातात. किस करताना मात्र या गोड क्षणाचे एका कॉमेडी सीनमध्ये रुपांतर होते. आजोबा जेव्हा आजींचा पापा घेततात तेव्हा तशीच आजींची कवळी अचानक निसटून बाहेर खाली पडते. यावेळी आजी-आजोबाही थोडे थक्क होतात. परंतु नंतर आजोब कवळी उचलण्यासाठी वाकतात. हा क्षण पाहून लाजून न जाता ते आजीला मदत करतात. आजी देखील कोणत्याही प्रकारे लाजून न जाता, किंवा आराडा-ओरडा न करता स्वत:च हासायला सुरुवात करतात. आजोबाही खदखदून हसतात. सध्या या गोंडस क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @viralchuski या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण झाले आहे. एका नेटकऱ्याने वयाला प्रेमाचं बंधन नसते हे यातून सिद्ध होते असे म्हटले आहे, तर दुसऱ्याने मजेशीर अंदाजात आजी-आजोबांची ट्युनिंग कमाल आहे असे म्हटले आहे. तर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






