(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
२६ मार्च २०२६ रोजी सोशल मिडियावर मिस ग्रँड थायलंडच्या स्पर्धेतील एक व्हिडिओ वेगाने शेअर केला जाऊ लागला. या व्हिडिओमध्ये एक अशी घटना घडली जिने काही वेळातत यूजर्सचे मन आपल्याकडे वेधून घेतले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की यात असं काय घडून आलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की, वास्तविक घडलं असं की, एक माॅडेल स्टेजवर माईकमध्ये बोलून उपस्थितांना आपली ओळख करुन देत होती. मात्र असं करत असतानाच अचानक तिच्या तोंडात तिने बसवलेल खोटे, बनावटी दात गळून पडतात ज्यामुळे लज्जास्पद स्थिती निर्माण होते.
मुख्य म्हणजे यानंतर माॅडेल कमोलवान चनागो अजिबात डगमगत नाही आणि आपला स्टेज प्रेझेंस टिकवून ठेवण्यासाठी ती लगेच ते दात पुन्हा आपल्या तोंडात बसवते आणि पुन्हा कॅमेराकडे वळते. तिच्या या कृतीकडे पाहून यूजर्स आता माॅडेलच्या हिमतीची प्रशंसा करत आहेत तर काही अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराची मन खोलून खिल्ली उडवत आहेत. दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @dom_lucre नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मिस थायलंड मंचावर बोलत असतानाच तिचे दात पडले; मात्र तिने ही परिस्थिती अत्यंत सहजपणे हाताळली आणि एक खास पोझ दिली’.
🔥🚨JUST IN: Miss Thailand’s teeth fell out while she was speaking on stage, she played it off and struck a pose. pic.twitter.com/5xrkM0H3w3 — Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) March 27, 2026
व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “च्यायला, आता काहीच खरं राहिलं नाही. सौंदर्य स्पर्धा विजेत्यांचे दातसुद्धा नाहीत. किमान व्हेनिअर्स तरी लावून घे. खोट्या दातांच्या कवळीसाठी खूपच लहान आहेस” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हाहा! मला नाही वाटत की तुम्हाला याची कल्पना असेल, की कितीतरी मॉडेल्स, अभिनेते आणि सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धक “फ्लिपर्स” (flippers) वापरतात. ते म्हणजे अक्षरशः दातांवर बसवता येणाऱ्या अशा ‘रिटेनर्स’चा (retainers) एक संच असतो, ज्यामुळे तुमचे दात अगदी परिपूर्ण दिसतात.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा! दबावाखालीही शांत राहणे, एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे परिस्थिती हाताळणे आणि तरीही खरा आत्मविश्वास दाखवणे याला म्हणतात!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






