BRICS 2026: 'आमच्याकडे आलात तर याद राखा!' इराणचे UAE ला थेट युद्ध-आव्हान; भारत दोन्ही शत्रूंना आणणार एकाच टेबलावर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
BRICS Summit 2026 India invitation : मध्य-पूर्वेतील वाळवंट आता रक्ताने माखण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे अमेरिका इराणवर मोठा भू-हल्ला (Ground Offensive) करण्याच्या तयारीत असताना, इराणने आपला मोर्चा आता इस्रायलवरून वळवून चक्क आपल्या शेजारील इस्लामिक देशांकडे, म्हणजेच संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि सौदी अरेबियाकडे वळवला आहे. या भीषण तणावाच्या परिस्थितीत भारताने ‘ब्रिक्स’ (BRICS) या जागतिक व्यासपीठाचा वापर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आहे.
गेल्या काही दिवसांत इराणने युएई आणि सौदी अरेबियावर शेकडो क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन हल्ले केले आहेत. इराणचा आरोप आहे की, युएई हा अमेरिका आणि इस्रायलला मदत करून इराणविरुद्धच्या युद्धात सक्रिय भूमिका बजावत आहे. “जर अमेरिकेचे पायदळ आमच्या भूमीवर आले, तर युएईला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” अशी उघड धमकी तेहरानने दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे आधीच जागतिक व्यापार ठप्प झाला असताना, आता या नव्या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे संकट अधिक गडद झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh ties: ‘शेवटचा शब्द, आम्ही भारताच्या विरोधात…’ बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी ‘असे’ म्हणून नवी दिल्लीत जिंकली मने
भारत सध्या ब्रिक्स (BRICS) देशांचे अध्यक्षपद भूषवत आहे. मे महिन्यात होणारी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आणि सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणारी १८ वी ब्रिक्स शिखर परिषद, यासाठी भारताने इराण, युएई आणि सौदी या तिन्ही देशांना निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही देश आता ब्रिक्सचे अधिकृत सदस्य आहेत. भारताचा हा प्रयत्न जगाला हे दाखवून देण्याचा आहे की, रणांगणावर एकमेकांचे रक्त सांडणारे देश चर्चेच्या टेबलावर एकत्र येऊ शकतात का? या परिषदेला रशियाचे पुतिन आणि चीनचे शी जिनपिंग यांचीही उपस्थिती असणार आहे, त्यामुळे हे व्यासपीठ युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
EAM @DrSJaishankar, alongside MoS’ @KVSinghMPGonda and @PmargheritaBJP launched the logo, theme and website of India’s BRICS Chairship 2026. India looks forward to hosting BRICS members and partner countries over the year, to build resilience, innovation, cooperation and… https://t.co/aayka5mi4Q — Randhir Jaiswal (@MEAIndia) January 13, 2026
credit – social media and Twitter
इराण सातत्याने भारताकडे एक मागणी लावून धरत आहे: “भारताने ब्रिक्स व्यासपीठावरून अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध करावा.” मात्र, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने अद्याप असा कोणताही निषेध नोंदवलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इराण ज्या देशांवर हल्ले करत आहे (UAE आणि सौदी), ते भारताचे धोरणात्मक भागीदार आहेत. आपल्या मित्रांवर हल्ले करणाऱ्या देशाच्या बाजूने उभे राहणे भारतासाठी अशक्य आहे. त्यामुळेच भारत सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War End: ‘सैन्य पाठवण्याची गरज भासणार नाही…’ 10 दिवसांचा डेडलाइन ड्रामा; रुबियोने सांगितला ट्रम्पचा खरा प्लॅन
९ आणि १० सप्टेंबर रोजी होणारी ब्रिक्स शिखर परिषद ही व्हर्च्युअल नसून प्रत्यक्ष होणार आहे. याचा अर्थ इराण आणि युएईच्या नेत्यांना एकाच छताखाली, एकाच शहरात समोरासमोर यावे लागेल. जर भारताने या नेत्यांना एका करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, तर ते भारतीय परराष्ट्र धोरणाचे सर्वात मोठे यश मानले जाईल. मात्र, तोपर्यंत आखातातील मरीन कमांडोंची वाढती संख्या आणि इराणचे हल्ले जगाला भीतीच्या छायेत ठेवणार आहेत.






