
शिक्षक आहे की हैवान? निर्दयीपणे चिमुकल्यांना केली बेदम मारहाण, विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून मन हेलावेल; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सध्या सोशल मिडियावर एका शाळेतील व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. यात एक निर्दयी शिक्षक वर्गातील काही लहान मुलांना मारहाण करताना दिसून आला. या मारहाणीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यातील दृष्यांनी मात्र यूजर्सचा संताप अनावर केला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक एका विद्यार्थीनीला एका मागून एक कानशिलात मारताना दिसतो. यानंतर तो तिला वर्गातील एक कोपऱ्यात जाऊन उभे राहण्यास सांगतो. मुलगी मागे जात असतानाच तो दुसऱ्या विद्यार्थीनीजवळ जातो आणि तिलाही कानशिलात मारतो, एकदा नाही तर दोनदा. शिक्षकाची ही मारहाण पाहून इतर विद्यार्थीही घाबरताना दिसतात. सर्व मुले इतके लहान असतात की विरोध करण्याचे बळ त्यांच्यात नसते. दोन्ही मुली मार खाल्यानंतर रडताना दिसतात पण त्यांच्या अश्रूंना त्या वर्गात कोणतीही जागा नसते. या घटनेला तेथील एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि मग याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. लोक व्हिडिओ पाहून संतापले असून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
हा व्हिडिओ @itz__daniyal80 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘याला शिक्षक म्हणायचे की मनोरुग्ण? हा शिक्षक मुलांना निर्दयपणे मारहाण करत आहे. विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे वागण्याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. शिक्षकांनी मार्गदर्शन आणि शिक्षण द्यायचे असते, मुलांना घाबरवायचे नसते. अशा शिक्षकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे’.
Is this called a teacher or a psycho? This teacher is brutally beating children. There is absolutely no justification for treating students this way.
Teachers are meant to guide and educate, not terrorize children. Strict action should be taken against such teachers. pic.twitter.com/Q7crQB0pBa — itz__daniyal80 (@itz__daniyal80) June 13, 2026
व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तो सायको वाटत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलांची चूक असेल तर त्यांना ओरडाव किंवा जास्तीचा अभ्यास द्यावा पण मारहाण करणं चुकीच आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांने नक्की कोणत्या कारणामुळे त्यांना इतकं मारलं?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.