Gorila Couple : बायको रागवली की असंच होतं! गोरिला कपलच्या भांडणाचा गोंडस VIDEO; पाहून नेटकरी म्हणाले, हा तर... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
A gorilla tries his best to reconcile with his angry wife under the rain !
What do you think 😃 pic.twitter.com/hY2z7TKj2l — The Nigerian Farmer (@Naija_farmers) June 14, 2026
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक मादी गोरिला रागवलेली दिसत आहे. कोणत्या तरी गोष्टीवरुन ती नाराज असल्याचे जाणवते. तर नर गोरिला तीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्याजवळ जाऊन प्रेमाने हात पुढे करत आहे. पण मादी गोरिला रागात त्याचा हात झटकून देते. पण नर गोरिला हार मानत नाही. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहतो आणि मादी गोरिला सतत चिडत राहते. त्याला हाकलून देते. तर आणखी एका व्हिडिओत नर गोरिला मादी गोरिलाने हाकल्यावर एकटा बसून दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जपानच्या नागोया शहरातील हिगाशियाना प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यानातील आहे. येथे किओमासा नावाच्या १३ वर्षी नर गोरिलाचा हा व्हिडिओ आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
BREAKING 🦍💔 Gorilla caught in extramarital jungle drama! Girlfriend found out, breakup confirmed.
X platform blamed for the leak. Now Gorilla is officially SINGLE & SAD… 😅 #GorillaSaga #Breakup #Gorilla https://t.co/6Od1PZeN1H pic.twitter.com/gR2fbJkZn6 — iRitvik (@iherrsonniger) June 13, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Naija_farmers या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, मानव आणि गोरिलाचा डीएन जवळपास सारखाच असतो हे व्हिडिओ पाहून पटलं आहे. एका नेटकऱ्याने किओमासा भाऊ आम्ही तुमती फिलिंग समजू शकतो असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने हा तर प्रत्येक विवाहित पुरुष आहे असे म्हटले आहे. दुसऱ्या व्हिडिओवरुन गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला वाटतं असे लोकांनी म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






