Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमत्कारच जणू! पर्वतावर उतरले आकाश, जिब्राल्टरमधील जादुई दृष्य पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Gibraltar Levante Effect : निसर्गाचा असा चमत्कार घडला की जणू थेट आकाशचं धरतीवर उतरले...! जिब्राल्टरमधील सुंदर दृष्यांनी आता यूजर्सचे डोळे दिपवून टाकले असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 03:34 PM
चमत्कारच जणू! पर्वतावर उतरले आकाश, जिब्राल्टरमधील जादुई दृष्य पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

चमत्कारच जणू! पर्वतावर उतरले आकाश, जिब्राल्टरमधील जादुई दृष्य पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जिब्राल्टरमध्ये निसर्गातील एक अनोखे आणि नेत्रदीपक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.
  • हवामानाशी संबंधित विशेष घटनेमुळे परिसर पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सनी या दृश्यावर आश्चर्य व्यक्त केले.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे काही असे दृष्ये केले जातात जे आपल्याला थक्क करतात, हसवतात तर कधी भावूक करुन जातात. आताही अलिकडे इंटरनेटवर असेच काहीसे दृष्य शेअर करण्यात आले आहे ज्यात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळाला. हा व्हिडिओ जिब्राल्टमधून समोर येत आहे. हे स्पेनच्या सीमेला लागून असलेले युनायटेड किंगडमचे (ब्रिटन) एक छोटेसे स्वायत्त परदेशातील क्षेत्र आहे. हे भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी मार्गावर स्थित आहे, ज्यामुळे याचे महत्त्व खूप जास्त आहे.

समुद्रात फोटोशूट करायला गेली होती महिला, तितक्यातच मागून झाली मोठ्या व्हेल माशाची एंट्री! पुढे जे घडलं… Video Viral

जिब्राल्टरच्या प्रसिद्ध ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’वरून एक नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक दृश्य अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ ‘लेवांटे’ नावाच्या वाऱ्याचा प्रभाव दाखवतो, जो भूमध्य समुद्रावरून वाहणारा एक उबदार आणि दमट पूर्वेकडील वारा आहे. जेव्हा हा वारा उंच कड्यांना धडकतो, तेव्हा तो वर जातो, थंड होतो, त्याचे घनीभवन होते आणि मग संपूर्ण परिसर दाट ढग,आणि धुक्याने झाकला जातो. यामुळे, संपूर्ण ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ कधीकधी ढगांमध्ये लपून जातो, ज्यामुळे असे वाटते की जणू आकाश पृथ्वीवर उतरले आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, ही एक नैसर्गिक आणि अद्वितीय हवामान घटना आहे, जिला ‘लेवांटे इफेक्ट’ असे म्हटले जाते. हे दृश्य जितके सुंदर आहे तितकेच रहस्यमय आहे आणि यामुळेच ते इतके खास बनते.

Beautiful clouds flowing over the Rock of Gibraltarpic.twitter.com/u2ai9sLMfq — Interesting things (@awkwardgoogle) September 16, 2024

एकटी राहतेस का? रॅपिडो बुक करताच रायडरने महिलेला केले अश्लील मेसेज; चॅट व्हायरल करताच कंपनीने दिली रिॲक्शन

निसर्गातील या अद्भूत दृष्यांचा व्हिडिओ @awkwardgoogle नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून वेगाने तो इंटरनेटवर शेअर केला जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘जिब्राल्टरच्या खडकावरून वाहणारे सुंदर ढग’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “व्वा! हे अप्रतिम आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ढग वाहताना पाहणे सुंदर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याला ‘मिस्ट्रिअल’ (Mistreal) म्हणतात—पहायला हे सुंदर असते, पण जेव्हा ते संपूर्ण शहराला वेढून टाकते, तेव्हा मात्र तुम्हाला खरोखरच थंडीचा कडाका जाणवू लागतो… त्यापेक्षा मला सूर्यप्रकाशच पहायला जास्त आवडेल…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video gibraltar rock covered in clouds levante wind natural phenomenon viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral
1

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral
2

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
3

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral
4

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.