Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिवंतपणी नरक पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, जमिनीतून उसळतेय आग अन् पाताळाहून कमी नाही हे ठिकाण; Video Viral

Ethiopia Danakil Depression : जगातील सर्वात धोकादायक ठिकाणाला भेट देऊन क्रिएटर आकाश चाैधरीने अंधाऱ्या जगातील ते भयानक वास्तव लोकांच्या नजरेस आणले. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 09:44 AM
जिवंतपणी नरक पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, जमिनीतून उसळतेय आग अन् पाताळाहून कमी नाही हे ठिकाण; Video Viral

जिवंतपणी नरक पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, जमिनीतून उसळतेय आग अन् पाताळाहून कमी नाही हे ठिकाण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • इथिओपियातील डॅनकिल डिप्रेशन हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि धोकादायक ठिकाणांपैकी एक मानले जाते.
  • येथे ज्वालामुखी, उकळते आम्लयुक्त झरे आणि विषारी वायूंमुळे वातावरण अत्यंत कठीण आहे.
  • ट्रॅव्हल ब्लॉगरने या ठिकाणाचा व्हिडिओ शेअर केल्याने लोक त्याच्या धाडसाने थक्क झाले आहेत.
नरकाविषयीच्या अनेक कथा आपण आजवर ऐकल्या असतील पण वास्तवात अशी जागा कुठे आहे की नाही याची कुणालाही माहिती नाही. पृथ्वीवर असे ठिकाण अस्तित्वात आहे की नाही याची तर कुणाला खात्री नाही. पण अलिकडेच यासंबंधित एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्तीने पाताळलोकाला चॅलेंज करु पाहणाऱ्या एका ठिकाणाचे दृष्य जगाला दाखवून दिले. भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर आकाश चौधरी यांनी इथिओपियामधील ‘अंडरवर्ल्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका रहस्यमय आणि धोकादायक ठिकाणाला भेट दिली आणि इथला व्हिडिओ त्याने सर्वांसोबत शेअर केला. इथिओपियातील ही जागा डॅनकिल डिप्रेशनच्या नावाने ओळखली जाते. ठिकाणाचे फोटोज आणि व्हिडिओज इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत असून लोक इथले दृष्य पाहून हादरुन गेले आहेत. चला ठिकाणाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ट्रेनमध्ये चढताना आला हार्ट अटॅक, स्टेशनवरच पडला अन् तडफडतच गेला व्यक्तीचा जीव; मृत्यूचा थरारक Video Viral

या ठिकाणाची धोकादायक गोष्ट म्हणजे इथली जमिन ही आतून स्पंदित होत असते. इथले तापनान ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. समुद्रसपाटीपासून १२५ मीटर खाली असलेले हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानले जाते. याला ‘पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण’ म्हणूनही ओळखले जाते. आकाश चाैधरी हा तरुण आपली साहसी प्रवासांसाठी ओळखला जातो आणि त्याच्या याच प्रवासात त्याने अखेर डॅनकिल डिप्रेशन या धोकादायक ठिकाणाला भेट दिली. त्याने त्याच्या ‘पाताल लोक’ या मालिकेतून हे ठिकाण जगासमोर आणले. व्हिडिओमध्ये तो ज्वालामुखीजवळ उभे असल्याचे दिसून येते जिथून लावा उसळत आहे. रंगीबेरंगी खनिजे, आम्लांचे गरम पाण्याचे झरे, पिवळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या पाण्याची तळी आणि गंधकाचा वास हे सर्वच पाहणं रंजक ठरतं पण मनात भितीची भावना देखील निर्माण करतं.

आकाशने कॅमेऱ्यासमोर सांगितले की, येथे चालताना श्वास घेणेही कठीण होते. उष्णता इतकी तीव्र असते की घामाच्या रूपात शरीरातील पाणी कमी होते आणि हवेतील आम्ल त्वचेला हानी पोहोचवू शकतात. तो जिवंत ज्वालामुखीच्या जवळ जाऊन “माझे शरीर पृथ्वीवर आहे, पण माझे मन मंगळावर आहे” असे म्हणताना दिसला.

ते इथिओपियाच्या अफार प्रदेशात वसलेले आहे. हा एक भूवैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. येथे तीन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे ज्वालामुखीजन्य गरम पाण्याचे झरे आणि सतत भूवैज्ञानिक हालचाली घडतात. दालोल प्रदेशातील सरासरी वार्षिक तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस असते, परंतु उन्हाळ्यात ते ५० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असू शकते. येथे पाऊस क्वचितच पडतो आणि जे काही पाणी पडते ते लगेच वाफ होऊन जाते. विस्तीर्ण मिठाची मैदाने, आम्लाने भरलेले गरम पाण्याचे झरे आणि उसळणारे वायूचे बुडबुडे या ठिकाणाला एखाद्या परग्रहासारखे भासवतात. शास्त्रज्ञांच्या मते, ही पृथ्वीवरील सर्वात कठोर पर्यावरणीय परिस्थितींपैकी एक आहे, जिथे सूक्ष्मजंतूदेखील जेमतेम जगू शकतात. त्याने सांगितले की, इथे पोहचायचे असल्यास स्थानिक जमातींच्या मार्गदर्शनाची मदत घ्यावी लागते, कारण इथला मार्ग हा फार धोकादायक आहे. इथे फक्त उष्णतेचाच नाही तर विषारी वायूंचाही धोका असतो. सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि इतर वायू हवा इतकी प्रदूषित करतात की दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास फुफ्फुसे आणि त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

पोत्यात भरली पोरं अन् १० वर्षांच्या योजनेनंतर अखेर कुटुंबाने नार्थ कोरीयातून केले पलायान; स्वातंत्र्याची थरारक कहाणी

आकाशने आपला हो धोकादायक प्रवास शेअर करताच अनेकजण त्याचे धाडस पाहून थक्क झाले. यूजर्सने त्याला भिती वाटली नाही का असे प्रश्न करत त्याची विचारपूस केली. एका यूजरने लिहिले की, “भावा स्वत:ची काळजी घे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा, व्हिडिओंच्या नावाखाली आपला जीव धोक्यात घालू नकोस, स्वतःचीही काळजी घे. आयुष्य अनमोल आहे भावा, तू सुद्धा कोणाचा तरी मुलगा, भाऊ, काका, नवरा, वडील असशील, त्यामुळे स्वतःचीही काळजी घे भावा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तुला कसली भिती नाही वाटत का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man shows worlds hottest place danakil depression viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • dangerous places
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

ताजमहालच्या फाऊंटनमध्ये माकडांची सुरु झाली पुल-पार्टी, मस्ती करत इकडून तिकडून बागडले अन् पर्यटक पाहतच राहिले; Video Viral
1

ताजमहालच्या फाऊंटनमध्ये माकडांची सुरु झाली पुल-पार्टी, मस्ती करत इकडून तिकडून बागडले अन् पर्यटक पाहतच राहिले; Video Viral

पतीला प्रेयसीसोबत पकडलं अन् भररस्त्यात सुरु केला राडा; केस ओढले, कानशिलात बडवलं… हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral
2

पतीला प्रेयसीसोबत पकडलं अन् भररस्त्यात सुरु केला राडा; केस ओढले, कानशिलात बडवलं… हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral
3

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral
4

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.