(फोटो सौजन्य: X)
नक्की काय घडलं?
मृत व्यक्तीचे नाव प्रीतम तिरवा असे असून तो मूळचा पश्चिम बंगालमधील दार्जिलिगचा रहिवाशी आहे. दिल्ली तो मोमोज विकण्याचा व्यावसाय करत होता. प्रीतम आपल्या पत्नी मोनिका रॉय यांच्यासोबत दिल्लीहून न्यू जलपाईगुडीला प्रवास करत होते. ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे पती-पत्नी एकत्र चढू शकले नाही. पत्नी एसी डब्यात चढली तर पती जनरल डब्यात चढला. जेव्हा ट्रेन टुंडला स्टेशनवर थांबली, तेव्हा प्रीतम आपले सामान घेऊन जनरल डब्यातून बाहेर पडला आणि पत्नीला भेटण्यासाठी एसी डब्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला. सीसीटिव्ही फुटेजमध्ये यापुढील दृष्य दिसून आले. यात आपण पाहू शकतो की, प्रीतम एसी कोचकडे जात आहे आणि यावेळीच ट्रेनच्या दरवाजाजवळ पोहचताच तो अचानक बेशुद्ध होतो आणि प्लॅटफाॅर्मवर पडतो. त्याला यावेळी हृदयविकाराचा झटका आल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बराच काळ मदत न मिळाल्याने प्रीतमचा जागीच मृत्यू झाला.
ट्रेन पकड़ने जा रहा था, जिंदगी छूट गई !! यूपी : फिरोजाबाद के टूंडला रेलवे स्टेशन पर ट्रेन में चढ़ने के दौरान एक व्यक्ति अचानक प्लेटफार्म पर गिरा। संभवतः हार्टअटैक आया था। उसके पैर प्लेटफार्म और ट्रेन के बीच खाली स्पेस में लटक गए। जैसे ही ट्रेन चली, वो घिसटता हुआ ट्रेन के नीचे… pic.twitter.com/9jKtXJy20U — Sachin Gupta (@Sachingupta) April 21, 2026
रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. सदर घटनेचा व्हिडिओ @Sachingupta नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने म्हटले की, “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. अशा वेळी, थोडीशी मदत आणि सावधगिरी बाळगल्याने कोणाचा तरी जीव वाचू शकला असता. माणुसकी दाखवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थोडीशी मदत कोणाचा तरी जीव वाचवू शकते, म्हणून अशा वेळी मदत पुरवली पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद आहे! लोकांनी इतके निर्दयी असायला नको”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






