गेल्या काही दिवसापासुन मेट्रोमधील (metro ) काही ना व्हिडिओ व्हायरल होत आहे. कधी कपल किस करताना दिसंत तर कधी कुणी बिकिनी घालुन मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसतं. आजकाल फेमस होण्यासाठी बहुतेक मेट्रोमध्ये असे काही प्रकार मुद्दामुन करत असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. मेट्रोमधील बिकिनी गर्ल (Bikini Girl) अजुनही सोशल मिडियावर चर्चेत असताना आता पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल (Metro Viral Video) होतं आहे. पण हा व्हिडिओ पाहुन तुम्ही म्हणात आता हेच पाहायच बाकी राहिलं होतं.
[read_also content=”Murderधक्कादायक! प्रियकरासह नको त्या अवस्थेत दिसली सून, भांडाफोड होण्याच्या भितीने मदतीने सासुसाऱ्यांचा गळा चिरुन केला खून https://www.navarashtra.com/crime/the-daughter-in-law-killed-her-mother-in-law-in-delhi-gokulpuri-area-nrps-383162.html”]
आजकाल लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करत आहेत. नुकताच मेट्रोमध्ये एका तरुणाचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण मेट्रोमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील न्यूयॉर्क मेट्रोचा आहे. हा तरुण एक युट्युबर आहे. व्हिडिओच्या सुरुवतीला तो सुटकेस उघडतो. कपडे काढतो आणि त्यानंतर सुटकेसमध्ये पाणी टाकल्यानंतर तो त्यातील बॉडीवॉश उघडतो. नंतर स्पंजने बॉडीवॉश स्वतःवर लावत एक-दोन मग पाणी ओततो आणि आंघोळीचे नाटक करतो. मग टॉवेल बाहेर काढून तो अगं पुसतो आणि पुन्हा कपडे घालतो. सुटकेस बंद करतो. पुढच्या स्टेशनवर उतरतो.
?Man taking shower in NYC train… pic.twitter.com/01t33sS0ha — Kusum Bhatt (@KusumBh061) April 9, 2023
हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असला तरीही मेट्रोमधील हा व्हिडिओ एक वर्षापेक्षा जुने आहे. आज पुन्हा एकदा तो व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनीमध्ये प्रवास करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कदाचित त्याचवेळी हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
11 नोव्हेंबर 2022 रोजी ‘princezee’ नावाच्या फेसबुक पेजवर ‘Tacking a shower in NYC train’ या मजकुरासह हा व्हिडिओ अपलोड करण्यात आले होता, जे तेव्हा 15 दशलक्ष लोकांनी पाहिले होता. आता हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होताच लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.
या व्यक्तीचे खरे नाव झीशान सरोया आहे. तो @PrinceZee नावाने एक YouTube चॅनल देखील चालवतो. झीशानचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 2017 मध्ये त्याने पहिला व्हिडिओ टाकला. मेट्रोमध्ये आंघोळ करणे झीशानसाठी काही नवल नाही. कारण तो अशाच विचित्र व्हिडिओ करण्यासाठी ओळखला जातो. त्याचे यूट्यूब चॅनल अशा विचित्र कृत्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. उदाहरणार्थ, कधी सूक्ष्मदर्शकाने शुक्राणू पाहणे, कधी सूक्ष्मदर्शकाने आईच्या दुधाकडे पाहणे किंवा सार्वजनिक ठिकाणी बालकाला मारल्यासारखे वागणे. भुयारी मार्गावर बेघर व्यक्तीची चेष्टा करणे किंवा सबवे बेडवर झोपणे.हे सर्व ‘सामाजिक प्रयोग’ या नावाने केले जाते.






