(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्स व्हिडिओ शेअर होतात तर कधी अनोख्या जुगाडांचे तर कधी अपघातांचे दृश्यही इथे शेअर केले जातात. याचबरोबर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओही पाहिले असतील. प्राण्यांचे जीवन हे मानवापेक्षा फार वेगळे असते ज्यामुळे जेव्हाही असे हे व्हिडिओ शेअर होतात लोक उत्सुकतेने ते पाहू लागतात. अधिकतर यात लढतीचे थरारक दृश्य दिसून येते. आताही इथे दोन पक्ष्यांमधील चकमकीचे काही रंजक दृश्य शेअर केले गेले आहे जे आता वेगाने व्हायरल होत आहे.
गरुड आणि गिधाड हे आकाशातील सर्वात मोठे शिकारी मानले जातात. सिंहाप्रमाणे हे दोन्ही पक्षी आपल्या भक्ष्यावर ताबा मिळवतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बाजा आणि गिधाड एकमेकांना भिडले. हे दृश्य अत्यंत दुर्मिळ होते कारण सहसा हे दोन पक्षी एकमेकांपासून दूर राहतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. व्हिडिओत नक्की काय आणि कसे घडते ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात गिधाड झाडाच्या फांदीवर आरामात बसल्याचे दिसून येते. तेवढ्यात अचानक एक गरुड तिथे येतो आणि त्याच फांदीवर गिधाडाच्या समोर येऊन बसतो. एकमेकांना असे आमने-सामने पाहून दोन्ही पक्षी संतापतात आणि तीक्ष्ण नजरेने एकमेकांना पाहू लागतात.यानंतर गिधाड लगेच गरुडावर हल्ला करतो. गरुड, जो मोठा आणि बलवान आहे, प्रथम लढण्याचा प्रयत्न करतो, परंतु गिधाडाचे अत्यंत आक्रमक वर्तन पाहून तो मागे हटते आणि पळ काढत तिथून निघून जातो. ही लढत फार काळ रंगली नसली तरी गरुडाचे असे पळून जाणे आता अनेकांना थक्क करत आहे.
बाईईईईई काय प्रकार! फोनवर बोलण्याच्या नादात आपल्याच बाळाला विसरली आई; धक्कादायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @hunting.world.ir नावाच्या इंस्टाग्राम काऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. गिधाड आणि गरुड दोन्ही वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. गिधाड आकाराने लहान असतात, तर गरुडाला मोठे पंख आणि तीक्ष्ण चोच असते. व्हिडिओतील दृश्य पक्ष्यांचे अद्भुत जग दाखवते, जे लोकांना आश्चर्यचकित करते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.