(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला खुश करतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही हे असे व्हायरल व्हिडिओज बऱ्याचदा पाहिले असतील. मात्र सध्या इथे एक असा अद्भुत व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांना भुरळ घातली आहे. हा असा व्हिडिओ क्वचितच तुम्ही कधी पाहिला असावा. यात झेब्राच्या प्रसूतीचे काही अद्भूत क्षण दिसूण आले. व्हिडिओत नक्की घडले ते सविसतर जाणून घेऊया.
झेब्राच्या प्रसूतीचा हा व्हिडिओ निसर्ग सौंदर्य आणि त्याचे चमत्कार दाखवतो. वन्यजीवांचे असे खास क्षण पाहणे फार रोमांचक ठरते, विशेषत: जेव्हा ते आपल्याला निसर्गाचे संरक्षण करण्याचे महत्त्व देखील समजावून देतात. दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांचा एक गट जंगल सफारीचा आनंद घेत असताना हा दुर्मिळ क्षण घडून आला. सफारी ग्रुपचा भाग असलेल्या एमी डिपोल्डने हा सुंदर क्षण लगेच आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. याचा व्हिडिओ आपल्या सोशल मिडियावर शेअर केला, जो आता वेगाने व्हायरल होत आहे.
बाईईईईई काय प्रकार! फोनवर बोलण्याच्या नादात आपल्याच बाळाला विसरली आई; धक्कादायक Video Viral
काय आहे व्हडिओत?
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक पर्यटक सफारीदरम्यान आपल्या गाडीतून फिरत असते. यावेळी तील समोर एक सुंदर दृश्य दिसते. ती पाहते की, समोर एक जिराफ बाजूला उभा आहे, त्याला बाजूला सारत ती पुढे जाते मात्र पुढच्याच क्षणी तिच्या नजरेस एक झेब्रा येतो, जो आपल्या बाळाला जन्म देणार असतो. हे समजताच ती आपली गाडी दुरवर थांबवते आणि हे संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेरात कैद करु लागते. झेब्राच्या डिलिव्हरीचे अद्भूत दृश्य ती पाहतच राहते आणि त्याचा व्हिडिओही बनवते. यात पुढे आपण पाहू शकतो की, नवीन जन्माला आलेला झेब्राचा मुलगा जन्मताच आपल्या पायांवर उभे राहण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला काही ते जमत नाही, जे पाहणे फार मजेदार ठरते. यावेळी त्याची आई त्याला धीर देत राहते. हे संपूर्ण दृश्य पाहणे फार अविस्मारणीय आणि रोमांचक ठरते. कधीही न पाहिलेले हे दृश्य पाहून आता अनेकजण सुखावले आहेत तसेच हा व्हिडिओ युजर्स वेगाने सर्चही करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @upwardwithamy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मजेदार तथ्य: झेब्रा नेहमी जिराफांच्या जवळ राहतात कारण त्यांना माहित आहे की जिराफ त्यांच्यापेक्षा आधी धोका ओळखू शकतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरोखरच अविश्वसनीय आहे की आपण त्याचे साक्षीदार आहोत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.