Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आई कधीच परतली नाही तर…” त्या प्रश्नावर चिमुकला झाला भावूक, दिले असे उत्तर की यूजर्सनाही अश्रू झाले अनावर; Video Viral

Heart Touching Video : मुलाच्या हृदयावर त्या प्रश्नाने मोठा प्रहार केला. तो भावूक झाला, रडला आणि त्याने असे काही उत्तर दिले की ऐकून यूजर्सनाही डोळ्यातील अश्रू रोखता आले नाही. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 25, 2026 | 11:45 AM
"आई कधीच परतली नाही तर..." त्या प्रश्नावर चिमुकला झाला भावूक, दिले असे उत्तर की यूजर्सनाही अश्रू झाले अनावर; Video Viral

"आई कधीच परतली नाही तर..." त्या प्रश्नावर चिमुकला झाला भावूक, दिले असे उत्तर की यूजर्सनाही अश्रू झाले अनावर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आईने विचारलेल्या काल्पनिक प्रश्नामुळे चिमुकला भावूक झाल्याचे व्हिडिओत दिसते.
  • मुलाच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मिडियावर भावनिक चर्चा रंगली.
  • अनेक यूजर्सनी अशा प्रश्नांवर नाराजी व्यक्त करत टीका केली.
सोशल मिडियावर शेकडो व्हिडिओज रोज शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ हे मनाला भिडतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. काही वेळी असंही घडतं की, नकळतपणे बनवलेले हे व्हिडिओज वादाच्या भोवऱ्यात अडकतात. अलिकडे असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओत एका चिमुरड्याला काल्पनिक प्रश्न विचारण्यात आला ज्यावर त्याची प्रतिक्रिया पाहून लोक भावूक झाले. लहान मुलाला असा प्रश्न विचारल्याने त्याच्या मनावर काय परिणाम झाला असावा या विचाराने यूजर्समध्ये चर्चेला उधाण आले. लोकांनी टिका करत प्रश्न विचारण्यावर आपला संताप देखील व्यक्त केला. आता हा प्रश्न नक्की काय होता आणि चिमुकल्याने यावर नक्की काय उत्तर दिले ते चला जाणून घेऊया.

शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आई आपल्या साडे तीन वर्षांच्या मुलाला प्रश्न करताना दिसते. ती म्हणते की, “जर आई निघून गेली आणि परत आली नाही तर तू काय करशील?” यावर सुरुवतीला मुलगा म्हणतो की, “मी तुझ्या फोटोवर प्रेम करीन.” पण काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागतात. जेव्हा आई त्याला विचारते की, तू का रडत आहेस तेव्हा तो आणखी भावूक होऊन म्हणतो की, “तू मरणार का? मी देवाकडे प्रार्थना करेन की माझी आई लवकर परत येऊ दे”.

मुलाला भावूक झालेलं पाहून अखेर आई त्याला धीर देताना दिसते आणि सांगते की त्याला सोडून कुठेही जाणार नाही. यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. व्हिडिओचा शेवट दिलासादायक असला तरी मुलाच्या उत्तराने सोशल मिडिया यूजर्सना भावूक करुन सोडलं. त्या प्रश्नाने त्याला किती त्रास झाला असावा या भावनेने यूजर्स अस्वस्थ झाले आणि लोकांनी या कमेंट्समध्ये या घटनेविषयी संताप व्यक्त करायला सुरुवात केली.

फिटनेसचं वेड जंगलाच्या राजालाही लागलं! खुल्या मैदानात सिंह करु लागला पुश-अप्स, पाहून सिहींणीलाही बसला धक्का; Video Viral

हा व्हिडिओ @wiggle_bear_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्याच्या जगात त्याला सर्व काही मिळू शकते… पण त्याच्या आईशिवाय काहीही नाही, असं प्रेम, ज्याला ‘हरणं’ समजतच नाही… ते फक्त तुला परत मिळवण्यातच विश्वास ठेवतं.’ व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्र्या व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “मला रडायला आलं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया करुन असं काही करु नका, त्याचा निरागस चेहरा तर पाहा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कृपया असे कधीही म्हणू नका, ज्यांना आई नाही त्यांना याचा खूप त्रास होतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: What if mom never returns a little boy gets emotional and gives a response that leaves users in tears viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.