महिलेची चूक की अपघात? रिव्हर्स घेताना कार थेट फाईव्ह स्टारच्या लॉबीत अन्...; पुढे जे घडलं थरारक, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही कार अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा लोकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत असतात. पण काही अपघात असे असतात की नेमकी चूक होती की अपघात हे लक्षात येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
तुम्ही पाहू शकता की, एका फाईव्ह स्टार हॉटेलचे ओपनिंग होत आहे. याच वेळी हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनेक महागड्या गाड्या आहेत. बाहेर रिसेप्शन डेस्कही उभारण्यात आला आहे. याच वेळी एक महिला गाडी घेऊन गेस्ट पिकअप पॉईंटवर थांबलेली आहे. आसपास काही लोक देखील गप्पा मारत उभे असल्याचे दिसत आहे. काही लोक गाड्या पार्क करताना दिसत आहे. या वेळी महिलेची कार अचान वेगात रिव्हर्स घ्यायला लागते अन् थेट हॉटेलच्या लॉबीत घुसते.
तुम्ही पाहू शकता की, हॉटेलच्या दरवाज्याचा काचा जोरात तुटून पडल्या आहे कार अगदी हॉटेलच्या आतपर्यंत घुसली आहे. तुम्ही पाहू शकता की, या घटनेमुळे आसपासच्या लोकांमध्ये आरडाओरडा सुरु आहे. कोणी किंचाळत आहे, तर कोणी एकमेकांना बाजूला ओढत आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
Bareilly: A woman lawyer lost control while reversing her car, crashed through the main gate of Hotel Ramada, and drove inside. Glass shattered, people ran to save themselves. CCTV footage has surfaced. pic.twitter.com/tsWt9T766t — Deadly Kalesh (@Deadlykalesh) July 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Deadlykalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत महिलेची चूक असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.