(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी म्हणून वाघाची ओळख आहे. अशात त्याच्याशी घेतलेला पंगा आपल्याला चांगलाच महागात पडू शकतो. वाघाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण आता नुकताच इथे एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात वाघ नव्हे तर बैलच वाघावर हल्ला करताना दिसून आला. एका बैलाने जंगलातील सर्वात बलाढ्य शिकाऱ्यावर केलेला हा हल्ला अनेकांना थक्क करणारा होता. बैल हिम्मत करत वाघावर हल्ला करतो खरा पण शेवटी तो वाघचं त्याच्यापुढे बैलाचा कायच निकाल लागणार. व्हिडिओत पुढे वाघ बैलाला जमीनदोस्त करत त्याचे असे हाल करतो की त्याची सर्व हिम्मत एका क्षणात अंगातून उतरून जाते. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका टोकाला बैल तर दुसऱ्या टोकाला वाघ आमने सामने उभे असल्याचे दिसते. वाघ बैलाकडे पाहत असतो तितक्यातच बैल धावत पळत वाघाच्या दिशेने जातो आणि स्वतःहून मृत्यू ओढवून घेतो. व्हिडिओत दिसते की, बैल वेगाने पळत वाघाच्या दिशेने धावत जातो, हे पाहून वाघही पूर्ण तयारीत बैलाच्या दिशेने वळतो आणि दोघांची जोरदार टक्कर होते. वाघ क्षणाचाही विलंब न करता बैलाला जमिनीवर लोळवतो ज्यानंतर दोन्ही प्राण्यांमध्ये एक भयंकर कुस्तीचा डाव सुरु होते. अखेर बैलाचे वाघासमोर काहीही चालत नाही आणि वाघ बैलावर पूर्ण नियंत्रण मिळवून त्याचा जागीच फडशा पडतो. अवघ्या १२ सेकंदाची ही शिकार सर्वांचाच श्वास रोखून धरते. याचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत असून लोक व्हिडिओला वेगाने शेअर देखील करत आहेत.
शिकारीचा हा व्हिडिओ @thebigcatsempire नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बुलने खूप मोटिवेशनल स्पीकर्स ऐकले असतील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एक योद्धा होतो ज्याचा मृत्यू झाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो त्या वाघाला तोंड देण्याइतका मोठा नव्हता. त्या दिवशी त्याचा अहंकारच त्याचा पराभव झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.