पठ्ठ्यानं थेट यमराजाला दिले मृत्यूचं आव्हानं! नागीण डान्स केला सापाला पकडलं अन् गळ्यात घातलं; पुढे जे घडलं थरराक, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी भयावह, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. यामध्ये तुम्ही स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. प्राण्यांसोबत स्टंट करणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये सापाचे अनेक भयावह व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. साप म्हटले की, अनेकांचा भीतीने थरकाप उडायला लागतो. त्याच्या एका दंशाने माणूस काही सेकंदातच मृत्यूला कवटाळतो. यामुळे सापांशी पंगा घेऊ नये. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका पठ्ठ्याला सापाच्या नादी लागणे चांगलेच महागात पडले आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस सापासोबत खेळताना, कर्तब करताना दिसत आहे. सापासमोर नागीण डान्स करत आहे. यावेळी नागीण डान्स करताना त्याने सापाला दोन-तीन वेळा मारलं देखील आहे. त्यानंतर जेव्हा पठ्ठ्यानं सापाला उचलून गळ्यात घातलं त्यानंतर जे घडलं भयानक आहे. पठ्ठ्याला सगळे कर्तब करताना सापाने बोटाला चावा घेतला आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला दवाखण्यात नेण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र पठ्ठ्याला सापाशी खेळणं जीवावर बेतलं आहे.
व्हायरल व्हिडिओ
⚠️: Don’t play with snakes
https://t.co/s9AjmmaM22 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 31, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने हा तर मृत्यूचा थरार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने अशा लोकांना कसे समजून सांगायचे असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एकाने हा व्हिडिओ खोटा असून माणूस जिवंत असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
VIRAL VIDEO : इंडिगो फ्लाइटमध्ये जोरदार गोंधळ; एका व्यक्तीने मुस्लिम प्रवाशाला लगावली कानशिलात
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.