आपल्या माशूकासोबत गप्पा मारत होता नवरा तितक्यात बायको आली अन् पळत पळत केली गर्लफ्रेंडची धुलाई; Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात तर कधी जुगाड तर कधी नवरा-बायकोच्या वादाचे व्हिडिओ… सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही हे असे व्हिडिओज कधी ना कधी नक्कीच पाहिले असतील. आताही इथे असाच एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला ते ज्यात एका बायकोने आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याची घटना घडून आली. आपल्या नवऱ्याला प्रेयसीसोबत बघितल्यानंतर बायकीने जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला तर काहींना हसू फुटले. चला व्हिडीओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका महिलेने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पडले अन् मग काय भररस्त्यातच तिने त्यांची धुलाई करायला सुरुवात केली. ही घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अलीपूर खुर्द गावात घडून आली आहे. येथे एका पत्नीने तिचा पती दुसऱ्या महिलेशी फोनवर बोलताना पकडला. यानंतर, ती संतापली आणि थेट पतीच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेली. पत्नीने गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन गोंधळ घातला आणि केस ओढून तिला बेदम मारहाण करू लागली.
यानंतर गर्लफ्रेंड कशी बशी बायकीचा तावडीतून सुटते आणि पळून आपला जीव वाचवू लागते. पण खरी गंमत तर तेव्हा सुरु होते जेव्हा बायकोही प्रेयसीमागे धावत तिचा पाठलाग करू लागते. एवढेच काय तर ती पळत पळत प्रेयसीला पकडते आणि पुन्हा तिची धुलाई करू लागते. यावेळी जवळच्या लोकांनी मध्यस्थी प्रयत्न केला खरा मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही आणि परिस्थिती आणखी बिकट झाली.
हा व्हायरल व्हिडिओ @TrueStoryUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील अलीपूर खुर्दचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.. ज्यामध्ये पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या घरी पोहोचल्यानंतर गोंधळ घातला. दरम्यान, महिलेने मुलीला मारहाणही केली. त्या महिलेचा नवरा मुलीशी फोनवर बोलत असे… जेव्हा त्याच्या पत्नीला हे कळले तेव्हा ती थेट मुलीच्या घरी गेली’.
UP के मुज़फ्फरनगर में अलीपुर खुर्द की एक वीडियो वायरल हो रही है.. जिसमे पति की गर्लफ्रेंड के घर पहुंच पत्नि ने हंगामा कर दिया। इस बीच महिला ने युवती की पिटाई भी कर डाली। महिला का पति युवती से फोन पर बात करता था.. यह बात उसकी पत्नि को पता चली तो वह सीधी युवती के घर पहुंच गई।… pic.twitter.com/haFRByVy3B
— TRUE STORY (@TrueStoryUP) May 4, 2025
व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जिथे पाहावं तिथे लग्नझालेल्यांची मजा सुरु आहे, अविवाहितांची काही कदर नाही, लाज वाटायला हवी अशा मुलींना ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बायकोच इतकी सुंदर दिसते, गाढवे चांगल्या बायकोला सोडून इतक्या वाईट प्रेयसीच्या प्रेमात कसे पडतात?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा